सिद्धी शुगर ॲन्ड अलाइड इंडस्ट्रीज लि. उजना ११ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सिद्धी शुगर ॲन्ड अलाइड इंडस्ट्रीज लि. उजना ता.अहमदपूर ११ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेबजी जाधव उपस्थितीत आमदार बाबासाहेब पाटील यांनी बॉयलर अग्निप्रदीपन केले. तसेच सर्व शेतकरी बांधव, ऊस उत्पादक सभासद, अहमदपूर, चाकूर, लोहा, कंधार, उदगीर, जळकोट, पालम व गंगाखेड तालुक्यातील जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.कारखान्याचा हंगाम २०२१-२२ दि.०१.११.२०२१ रोजी चालु होऊन दि.२७.०५.२२ सांगता झाला. हंगाम २०२१-२२ मध्ये ६,५३,६१४६८४ गाळप होऊन ९.७२ टक्के रिकव्हरी ६,३५,३०० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखान्याची एकुण एफ.आर.पी. रक्कम रु.२४३७.७६ असुन पहिला हप्ता रक्कम रु.२००० अदा करण्यात आला आहे. दुसरा हप्ता रक्कम रु.२०० दि.१८.०८.२०२२ रोजी व तिसऱ्या हप्त्यापैकी रक्कम रु.१०० प्रमाणे दि. २८.०९.२०२२ रोजी अदा केले आहे. असे प्रती मे.टन प्रमाणे आज अखेर रक्कम रु.२,३०० ऊस उत्पादक शेतक-यांना अदा केले. उर्वरीत रक्कम रु.१३७.७६ प्रमाणे दि. १०.१०.२०२२ च्या आसपास अदा करण्यात येईल.प्रसंगी समवेत माजी मंत्री बाळासाहेबजी जाधव साहेब,आमदार बाबासाहेब पाटील साहेब,माजी सरपंच साहेबराव जाधव , माजी उपसभापती पद्माकरराव पारील जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद तात्या हेंगणे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, ऍड. भारतभूषण क्षीरसागर, श्याम देवकत्ते, जि. प सदस्य माधवराव जाधव, बालासाहेब पाटील आंबेगावकर, युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, श्रीकांत मजगे, सय्यद नबी, बळीराम मामा माकने, ॲड. सादिक शेख, तुकाराम पाटील, व्हाईस प्रेसिडेंट पी.झी होनराव, शेषराव चावरे, जनरल मॅनेजर एस.आर पिसाळ, शेतकी अधिकारी मॅनेजर पी. ए. मिटकर, फॅक्टरी मॅनेजर बी.के कावलगुडेकर, कमलाकर शेखापुरे, अशोकराव कासले, शिवशंकर आगलावे, वेंकट वंगे, कार्तिक घाटीवाले, दयानंद पाटील, गिरिधर पौळ, नामदेव सोळुंके, बालेश पौळ, अशोकराव मोरे, राजू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.