अहमदपुरात सार्वजनिक दसरा महोत्सव उत्साहात साजरा

अहमदपुरात सार्वजनिक दसरा महोत्सव उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : रावण दहना सोबत मानवाने स्वतःमधील सर्व दुर्गुणांचे दहन करावे असे जाहीर आवाहन भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांनी केले. ते दिनांक पाच रोजी महात्मा गांधी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर सार्वजनिक दसरा महोत्सव सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि वीरमठ संस्थांचे मठाधिपती परमपूज्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज हे होते व्यासपीठावर ह भ प गुरुवर्य आनंद महाराज बेलगावकर यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना आचार्य गुरुराज स्वामी म्हणाले की मानवी जीवनातील द्वेष मत्सर असूया कायमस्वरूपी संपवून जीवनाकडे सकारात्मकतेने पहावं असे सांगितले.

यावेळी गुरुवर्य ह भ प अनंत महाराज बेलगावकर म्हणाले की, प्रत्येकाच्या शरीरामध्ये रावणाने घर केले आहे. त्यामुळे त्याला शरीरातून बाहेर काढले पाहिजे. भारतीय संस्कृती मधील चार देवांचे अग्रहाणे पालन करावे असे सांगितले. यावेळी विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या मान्यवरांचा त्यात तलवारबाजी देशात नाव गाजवणाऱ्या ज्ञानेश्वरी शिंदे हिचा, टागोर शिक्षण व महेश शिक्षण संस्थेच्या संस्थेच्या अध्यक्षपदी डॉक्टर अशोक सांगवीकर यांची निवड झाल्याबद्दल, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्राध्यापक दत्ता गलाले यांचा, नीट परीक्षेत 670 गुण घेणारा साई मोरलावार, आय आय टीत प्रवेश प्राप्त रितेश फुलारी आणि महात्मा बसेश्वर सामाजिक समता पुरस्कार मिळाल्याबद्दल राम तत्तापुरे यांचा गुरुवर्यांच्या हस्ते सन्मानपत्र ,शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. दसरा महोत्सवाच्या निमित्ताने शहरातून राजराजेश्वरी रेणुका माता पालखी, राजे शेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची पालखी, मलसिद्ध स्वामी महाराजांची पालखी, देशीस्वामी मेना यांची पालखी या चारही पालकी यांचे शहराच्या मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये आगमन झाले. यावेळी प्रथम शासनाच्या वतीने तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते विधिवत शस्त्राचे पूजन करण्यात आले.

यावेळी आमदार बाबासाहेब पाटील, माजी मंत्री विनायकराव पाटील, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके ,माजी आमदार बब्रुवान खंदाडे, शिक्षण महर्षी डी.बी. लोहारे गुरुजी, दसरा महोत्सव चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सांब महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हिंगणे ,जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, मार्गदर्शक ओम भाऊ पुणे, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत कासनाळे, माजी नगरसेवक अभय मिरकले, माजी नगरसेवक राहुल शिवपुजे, माजी नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, वसंतराव शेटकर प्राचार्य अनिता शिंदे, एडवोकेट निखिल कासनाळे, डॉक्टर ऋषिकेश पाटील सह मान्यवरांची उपस्थिती होती.

रावण दहन नगर परिषदेचे प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी व नकोशी मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष राम पाटील यांनी सूत्रसंचालन राम तत्तापुरे व गोविंद गिरी यांनी तर आभार प्राध्यापक विश्वंभर स्वामी यांनी मांडले.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक पापा आया, शिवकुमार उडगे, माधव पुणे, विकास महाजन, सुभाष गुंडीले, शैलेश जाधव, साईनाथ पाटील, अनिकेत काशीकर, संगम पाटील सह दसरा महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी डोळ्याचे पारणे फेडणारे नयनरम्य आतिषबाजी झाले यावेळी महात्मा गांधी मैदान दसरा प्रेमी नागरिकांनी प्रचंड गर्दीने फुलून गेले होते.

About The Author