यशवंत विद्यालयात गणित प्राविण्य परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार संपन्न

यशवंत विद्यालयात गणित प्राविण्य परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : गणित अध्यापक महामंडळ च्या वतीने घेण्यात आलेल्या गणित संबोध, गणित प्रज्ञा आणि गणित प्राविण्य परीक्षेतील गुणवंत, प्रज्ञावंतांचा सत्कार मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून गणित अध्यापक महामंडळाचे राज्य कार्यकारणी सदस्य विजय किलचे, जिल्हा सदस्य जिलानी शेख, तालुका सदस्य शिवानंद उंदीरकल्ले, पर्यवेक्षक उमाकांत नरडिले सह मान्यवरांची उपस्थिती होती. या समयी गणित प्राविण्य परीक्षेतील संस्कृती नागरगोजे, शुभांगी पाटील, सुधीर मुंडे, अभिषेक जोशी, सुरज हेमनर सृष्टी नलाबले, किरण गुट्टे, सृष्टी पाटील यांचा व गणित प्रज्ञा व गणित संबोध परीक्षेतील तालुक्यातून प्रथम आलेल्या अनिकेत बावगे यांच्यासह विशेष प्राविण्य विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक राजकुमार बोराळकर यांनी सूत्रसंचलन गुराप्पा बावगे यांनी तर आभार राम तत्तापुरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणित विभागाचे राजकुमार बोराळकर, संतोष मालवदे, सुदर्शन फुलमंटे, गौरव चवंडा,सोलापुरे प्रतिभा, देशमुख मेघा, राजकुमार पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!