मांजरा साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन 10 ऑक्टोंबर रोजी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते होणार
लातूर (प्रतिनिधी) : देशाच्या साखर कारखानदारीत सहकार क्षेत्रात अव्वलस्थानी असणाऱ्या लातूरच्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन 22 -23 चा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ राज्याचे माजी मंत्री तथा मांजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख यांच्या शुभ हस्ते 10 ऑक्टोंबर सोमवारी सकाळी नऊ वाजता संपन्न होणार आहे.
मागील वर्षी कारखाना कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र झाल्याने संपूर्ण उसाचे गाळप राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री तथा आमदार अमितजी देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्व उसाचे यशस्वी प्रमाणे गाळप करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात ऊसाची उपलब्धता असल्याने कारखाना प्रशासनाने माननीय संचालक मंडळाच्या निर्देशानुसार मोठ्या प्रमाणात कारखान्याची यंत्रणा उपलब्ध करून सभासदांना जो शब्द दिला होता त्या शब्दाची पूर्तता करून कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळ मांजरा साखर कारखान्याने केलेले असुन यावर्षीही कारखाना कार्यक्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक झाल्याने मोठ्या प्रमाणात उसाचे लागवड झालेली आहे गाळपास उसाची उपलब्धता भरपूर असणार आहे त्या दृष्टीने कारखाना प्रशासनाकडून चालु गाळप हंगामासाठी पूर्वतयारी करण्यात आली आहे कारखाना कार्यक्षेत्रात उसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात दिसत असून त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.
येणारा गळीत हंगाम 2022 23 चा वेळेवर चालू होण्यासाठी कारखाना प्रशासन तयार करत असून १० आक्टोंबर रोजी सोमवारी सकाळी नऊ वाजता माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न होणार आहे या कार्यक्रमास ऊस उत्पादक, सभासद, हितचिंतक ,ठेकेदार ,गाडीवान नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व सन्माननीय संचालक मंडळ यांनी केले आहे.