आ.रमेशआप्पा कराड, सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत लातूर क्रेडाई प्रॉपर्टी एक्सप्रोचे उद्घाटन

आ.रमेशआप्पा कराड, सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत लातूर क्रेडाई प्रॉपर्टी एक्सप्रोचे उद्घाटन

लातूर (प्रतिनिधी) : लातूरकरांना परवडणारे आणि पसंतीला येणारे प्लॉट, घर, रो हाऊस, फ्लॅट, बंगलो एका छताखाली मिळवून देणाऱ्या लातूर क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोर्ट 2022 चे उद्घाटन क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड, सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे, जिल्हाधिकारी बी पी पृथ्वीराज, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी लातूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क टाऊन हॉलच्या मैदानावर संपन्न झाला.

लातूरच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रॉपर्टी एक्स्प्रोचे आयोजन करण्यात आले असून जवळपास नामांकित 50 बिल्डर्सनी स्टार उभे केले आहेत चार दिवस चालणाऱ्या या एक्सप्रेस घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना सर्व प्रकारची मदत आणि माहिती दिली जाणार आहे.

लातूरच्या इतिहासा बरोबरच लातूरच्या कर्तत्वान माणसामुळे लातूरचे नाव महाराष्ट्रात अथवा देशातच नव्हे तर संपूर्ण जगभर झाले आहे या क्षेत्रात कष्ट मेहनत याबरोबरच माणुसकी आणि कामाचा दर्जा यावर यश अवलंबून असल्याचे सांगून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी बिल्डर्स लातूरच्या सौंदर्यात निश्चित भर टाकतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

उद्घाटन सोहळ्यास क्रेडाईचे आशिष पवार माजी महापौर विक्रांत गोजमगुडे माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार जिल्हा उपपोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत क्रेडाईचे सुबोध बेळंबे धर्मवीर भारती जगदीश कुलकर्णी महेंद्र नावंदर उदय पाटील किरण मंत्री दीपक कोटलवार जयकांत गीते आशिष कामदार कमलकिशोर धूत संतोष हत्ते अमोल मुळे शांतीलाल कटारिया यांनी स्वागत केले.

About The Author

error: Content is protected !!