विधीज्ज्ञ निखिल कासनाळे, पत्रकार काळेंसह शिंदे यांची ‘मिया वाकी’ला भेट
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयातील नाविन्यपूर्ण असा ‘मिया वाकी’ अर्थात ‘आनंद घन वन’ हा प्रकल्पास भारतीय जनता पार्टीचे युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिद्ध विधिज्ज्ञ ॲड. निखिल कासनाळे, पोलीस फ्लॅश न्यूजचे पत्रकार गोविंद काळे व दै. पुण्यनगरीचे पत्रकार चंद्रकांत शिंदे या मान्यवरांनी भेट देऊन पाहणी करून कौतुक केले.
लातूर जिल्ह्यात सर्वप्रथम महात्मा फुले महाविद्यालयाने सुरू केला असून, या प्रकल्पाला शहाजीराजे ऑक्सिजन पार्क असे नाव दिले या प्रकल्पास अहमदपूर येथील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते ॲड.निखिल कासनाळे, पोलीस फ्लॅश न्यूज चे पत्रकार गोविंद काळे व दै. पुण्यनगरीचे पत्रकार चंद्रकांत शिंदे यांनी महाविद्यालयाला सदिच्छा भेट देऊन माहिती घेत पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी नाविन्यपूर्ण असलेल्या शहाजीराजे ऑक्सिजन पार्क ‘मिया वाकी’ या प्रकल्पाचे कौतुक केले. या प्रकल्पाबद्दल प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी सविस्तर माहिती दिली.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रम राबविणारे महाविद्यालय म्हणून महात्मा फुले महाविद्यालयाची ओळख आहे. यावेळी अॅड. कासनाळे यांच्यासह मान्यवरांनी गुणवत्ते बरोबरच पर्यावरण संवर्धनाचे मोलाचे कार्य अविरतपणे करीत असल्याबद्दल प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचे अभिनंदन केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.