मौजे गंगापूर येथे लाभार्थ्यांच्या दारी जाऊन अनुदान वाटप, नवा आदर्श!!
हेर (एल पी उगिले) : उदगीर तालुक्यातील विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गंगापूर -भाकसखेडाचे चेअरमन विवेक जाधव यांनी उदगीर तालुका जिल्हा बँकेचे फिल्ड ऑफिसर हणमंतराव पवार यांना विनंती करून मौजे गंगापूर व मौजे भाकसखेडा येथे उदगीरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वर्धापकाळ योजना तसेच सतत पावसाचे अतिवृष्टी अनुदान जमा केले. असल्यामुळे परिसरातील सर्वसामान्यची दिवाळी आनंदात व्हावी. व वृद्ध महिला पुरुष यांना लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा देवर्जन येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, त्यामुळे व्हॅन द्वारे पैसे वाटप करण्याची विनंती केली.
उदगीर तालुका जिल्हा बँकेचे कार्यतत्पर फिल्ड ऑफिसर हनुमंतराव पवार , व्हॅन प्रमुख मनोहर केंद्रे, शाखा व्यवस्थापक शंकर पात्रे, कॅशियर शिंदे ,सुरेश खटके, शाखा हिशोब तपासणीस अण्णासाहेब मुळे, वाहन चालक हरिदास गुडसुरे यांनी सर्व लाभार्थी यांची अत्यंत जलद गतीने नोंदी घेऊन सर्वांना गावातच कसे पैसे उपलब्ध होतील यासाठी परिश्रम घेतले. गावातच सर्वसामान्याला कसा लाभ होईल, यासाठी विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विवेक जाधव, व्हाईस चेअरमन हंसराज माळेवाडी, संचालक गणेश पटवारी, शिवनंदाताई बिरादार,संदीप मोरे, सुधाकर बिरादार, सोजरबाई जाधव, विजयकुमार बुरले, अविनाश गायकवाड यांनी परिश्रम घेतले आहेत.
हा उपक्रम राबविल्याबद्दल,सहकार महर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख , लातूर जिल्हा बॅकेचे चेअरमन आ. धीरजभैया देशमुख , लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका श्रीमती लक्ष्मीताई भोसले ,उदगीरचे कर्तव्यदक्ष तसिलदार रामेश्वर गोरे तालुका फिल्ड ऑफिसर हनुमंतराव पवार यांचे शेतकरी तसेच लाभार्थी आभार मानुन आनंद व्यक्त करित आहेत.