बॅडमिंटन स्पर्धेत नागेश भरत चामलेला तिहेरी मुकुट

बॅडमिंटन स्पर्धेत नागेश भरत चामलेला तिहेरी मुकुट

लातूर (एल.पी.उगीले) : स्व. राजगोपाल भार्गव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तथा लातूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व्दारा आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन दयानंद बॅडमिंटन हॉल येथे दिनांक २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले. या स्पर्धेत ११ वर्षे आतील मुले, १३ वर्षे आतील मुले,१५ वर्षे आतील मुले,१७ वर्षे आतील मुले,१९ वर्षे आतील मुले, प्रौढ गट व ३५ वर्षे पेक्षा अधिक वयोगटातील व वरीष्ठ गटातील पुरुष अशा एकुण २०० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

एकीरी स्पर्धेचा अंतिम निकाल
११ वर्षे आतील मुले विजेता मोहम्मद सैफान खान,उपविजेता सिद्धेश माने,
१३ वर्षे आतील मुले विजेता रणविर थोरमोटे, उपविजेता आर्यन मालपाणी.
१५ वर्षे आतील मुले विजेता सुमित माडे.
उपविजेता रुद्रप्रतापसिंह पाटील,
१७ वर्षे आतील मुले
विजेता नागेश चामले, उपविजेता पंकज चिंते.
१९ वर्षे आतील मुले विजेता नागेश चामले,
उपविजेता पंकज चिंते.
प्रौढ गट विजेता नागेश चामले,उपविजेता अर्णव चांडक.
३५ वर्षे पेक्षा अधिक वयोगट
विजेता दुर्गेश ब्रिजवासी,उपविजेता कैलाश ढोले.
दुहेरी स्पर्धेचा अंतिम निकाल
प्रौढ गट
विजेती जोडी अर्णव चांडक , सुबोध टीलक.
उपविजेती जोडी अविनाश अडसूळ, सुशांत घाडगे.
३५ वर्षे पेक्षा अधिक वयोगट
विजेती जोडी दुर्गेश ब्रिजवासी, हर्षवर्धन बदाडे.
उपविजेती जोडी श्रीकांत शेळके , संदिप संमुखराव.
बक्षीस वितरण समारंभ, बक्षिस वितरण सोहळ्यास दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे स्पर्धा सचिव तथा लातूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव आशिष बाजपाई, मनोज भार्गव मायक्रोसॉफ्ट (USA), लातूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष बाबुराव वाघमारे , कोशाध्यक्ष एन एस रेड्डी, भरत चामले व प्रमोद दुधाळे यांच्या हस्ते पारीतोषक वितरण करण्यात आले.

विशेष सत्कार
ज्वालागुट्टा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन रॅंकिंग स्पर्धेत नागेश चामले या लातूरच्या खेळाडूंने उपान्त्य पूर्व सामान्यांपर्यंत मजल मारत संपूर्ण भारतात ८ वे स्थान निश्चित केले. या ऐतिहासिक कामगिरी बद्दल लातूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन च्या वतिने रोख रक्कम ११०००/- शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन या खेळाडूला सन्मानीत करण्यात आले. त्याच समवेत नागेश चामले याचे वडील भरत चामले व श्रवण दुधाळे ( राष्ट्रीय खेळाडू ) याचे पालक प्रमोद दुधाळे यांचाही बेस्ट सपोर्टीव पालक म्हणून सन्मान करण्यात आला.

या बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत असताना लातूर जिल्ह्यातील उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू घडण्यासाठी व त्यांना स्पर्धात्मक स्वरूपात संधी मिळावी, यासाठी प्रत्येक महिन्याला विविध प्रकारच्या स्पर्धां आयोजित केल्या जातील असे विधान महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे स्पर्धा सचिव आशिष बाजपाई यांनी केले.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा संयोजक अभय शाह. स्पर्धा आयोजक वेदांत राठी, अद्वैत गोडबोले, आदित्य केसाळे यांनी तर पंच प्रमुख नरेश गुंडले ( औरंगाबाद ) पंच विजय भंडारे, गजेंद्र बोधे,दिपक यंगलवाड,ओमनाथ तुमकुटे, व हिमांशू गुंडले यांनी कार्य केले. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण व सुत्रसंचलन मुकेश बिराजदार यांनी केले.

About The Author