भारतीय अन्न महामंडळाच्या सल्लागार समितीच्या सदस्यपदी पै. बालूभाऊ मुरकुटे यांची निवड

भारतीय अन्न महामंडळाच्या सल्लागार समितीच्या सदस्यपदी पै. बालूभाऊ मुरकुटे यांची निवड

वाशिम (प्रतिनिधी) : येथील सुपुत्र युवा माजी नगरसेवक पै. बालुभाऊ मुरकुटे यांची देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा भारतीय अन्न महामंडळाच्या सल्लागार समिती सदस्य पदी नियुक्ती झाली आहे. ३ लाख २४ हजार कोटी रुपये बजेट असलेले हे महामंडळ असून देशातील शेतकऱ्यांचे उत्पादन हमी भावाने खरेदी करत असते. अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातील असलेले माजी नगरसेवक बालूभाऊ मुरकुटे यांना केंद्र सरकार ने अत्यंत महत्वाची जबाबदारी दिली आहे.

हे महामंडळ देशातील गरीब कुटुंबांसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. रेशनिंग तसेच अन्नसुरक्षा कायद्या अंतर्गत संपूर्ण देशात स्वस्त तांदूळ आणि गहू पुरवठा हे महामंडळ करत असते. त्याच बरोबर मध्यान्ह शालेय पोषण आहारा साठी सुद्धा या महामंडळाकडून राज्य सरकार कडे धान्य पुरवठा केला जातो. या सर्व पार्श्वभूमीवर अन्नधान्य उत्पादक आणि ग्राहक यांचे हित रक्षण करणे, तसेच अन्न धान्य खरेदी, त्याची साठवणूक आणि पुरवठा करण्यासाठी धोरणे आखणे व केंद्र सरकार ला सल्ला देणे असे या समितीचे मुख्य उद्देश आहे. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये भारतीय खाद्य महामंडळाच्या वखारी आहेत. राष्ट्रीय अन्न महामंडळाच्या सल्लागार समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याने वाशिम जिल्ह्यातून बालूभाऊ मुरकुटे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

About The Author