राज्यात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता

0
राज्यात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे राज्यात १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
या दरम्यान ५०-६० किमी/ताशी वाऱ्यासह समुद्रात खवळलेली स्थिती राहणार असून मच्छिमारांनी या कालावधीत समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मंत्रालयीन स्तरावरील राज्यस्तरीय आपत्कालीन कार्यकेंद्र २४x७ सुरू आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षासाठी फोन नं. ०२२-२२०२७९९० किंवा ०२२-२२७९४२२९ किंवा ०२२-२२०२३०३९ तसेच मोबाईल – ९३२१५८७१४३ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!