अँड युवराज पाटील सिनेट निवडणुकीत विजयी, अहमदपुरात जल्लोष
अहमदपुर (गोविंद काळे) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या अधिसभा,सिनेठ सदस्यांची अटीतटीची निवडणूक नुकतीच झाली होती. सदरील निवडणुकीत अँड.युवराज पाटील यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच च्या पदवीधर मतदारसंघातून खुला प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सदरील सिनेट निवडणुक विरोधी पॅनलने प्रतिष्ठेची केल्याने युवराज पाटील यांच्या पुढे गड कायम राखणे मोठे जिकिरीचे झाले होते. अशा वादळी निवडणूकीत अँड.युवराज पाटील हे सिनेट सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर अहमदपूर व चाकुर तालुक्यात फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी विजयी उमेदवार अँड.युवराज पाटील यांचा भव्य सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
सदरील सत्कार सोहळ्यात माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या सह माजी सभापती अशोक काका केंद्रे, भाजपचे प्रदेश सदस्य परमेश्वर आबा घोगरे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव गिरी, नगरसेवक राहुल शिवपुजे, माजी उपसभापती निळकंठ पाटील, राजकुमार खंदाडे, रामभाऊ बेल्लाळे, अँड.किशोर कोरे, सरपंच केरबा कांबळे, बबन नवटक्के,संगम कुमदळे यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.