महात्मा फुले महाविद्यालयाला धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक

महात्मा फुले महाविद्यालयाला धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या य. च. म. मु. विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रातील नागेश अच्युत केंद्रे या विद्यार्थ्यास नांदेड विभागीय आंतर महाविद्यालयीन वैयक्तिक क्रीडा स्पर्धेच्या ८०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक प्राप्त झाले असून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेतही फुले महाविद्यालयाचे विद्यार्थी आघाडीवर आहेत.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अभ्यास केंद्राचे केंद्र प्रमुख तथा प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली तसेच केंद्र संयोजक प्रोफेसर डॉ.अनिल मुंढे, केंद्र सहाय्यक डॉ. संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागेश अच्युत केद्रे या विद्यार्थ्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या नांदेड विभागीय क्रीडा प्रकारातील वैयक्तिक स्पर्धेत ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्णपदक प्राप्त केले असून त्याची निवड नाशिक येथील केंद्रीय विद्यापीठाच्या स्पर्धेसाठी झाली आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्रप्रमुख डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी तसेच किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव, सहसचिव व सर्व पदाधिकाऱ्यांनी, तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र नांदेडचे संचालक प्रा. विजयकुमार पाईकराव, कुलसचिव डॉ. चंद्रकांत पवार आदिंनी अच्युत केंद्र या व इतर सहभागी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्रो.अनिल मुंढे, डॉ. संतोष पाटील मार्गदर्शकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author