महात्मा फुले महाविद्यालयात उस्ताद लहुजी साळवे व पं.नेहरू यांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आधुनिक भारताचे जनक तथा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती राष्ट्रीय बालक दिन व राष्ट्रीय जैवत तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरी करण्यात आली. तसेच, यावेळी उस्ताद लहुजी साळवे यांची ही जयंती साजरी करण्यात आली.
याबाबतची सविस्तर वृत्त असे की, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर उपप्राचार्य दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू व उस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोपा प्रसंगी प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी पंडित जवाहरलाल नेहरू व उस्ताद लहुजी साळवे यांच्या जीवन व कार्य जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, प्रोफेसर डॉ. अभिजीत मोरे, डॉ. मारोती कसाब, प्रा. अतीष आकडे, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. डी. एन. माने, डॉ. एस. एच. गर्जे, प्रा.परमेश्वर इंगळे, डॉ. संतोष पाटील, डॉ. प्रा. डी.जे. चव्हाण, प्रा. प्रकाश गायकवाड, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी, वामनराव मलकापुरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.