खेळाडूवृत्ती हाच खरा जगण्याचा आधार – डॉ. उध्दव भोसले

खेळाडूवृत्ती हाच खरा जगण्याचा आधार - डॉ. उध्दव भोसले

शिरूर ताजबंद (गोविंद काळे) : येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात ते बोलत होते. ‘खेळाडूवृत्ती केवळ स्पर्धाच नव्हे तर आपले आयुष्य उभी करणारी संजीवनी आहे. खेळाडूप्रमाणे संघ व्यवस्थापक, संघ मार्गदर्शक यांनीही खेळाडू वृत्ती जोपासावी. खेळ खेळताना खेळाडूंनी व्यावसायिकताही जपावी,’ असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आंतर विभागीय बॅडमिंटन, टेबल टेनिस तसेच ब विभागीय मैदानी (मुले/मुली) स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री तथा संस्था अध्यक्ष बाळासाहेब जाधव उपस्थित होते. तसेच यावेळी संस्था सचिव आमदार बाबासाहेब पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना जीवनात कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग यश मिळविण्याची क्षमता खेळाडूमध्ये असून सातत्य, संयम आणि मेहनतीने खेळाडूंनी गाव, राज्य तसेच आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करावे असे मत प्रतिपादन केले.
यावेळी शारीरिक शिक्षण असोसिएशनच्या वतीने कुलगुरूपदाची चार वर्ष यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल विद्यमान कुलगुरू डॉ. उध्दव भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा ज्योत वाहक म्हणून महाविद्यालयाचा तिहेरी उडीचा राष्ट्रीय खेळाडू अपसनवाड राहुल याने कार्यभार वाहिला.
यावेळी संस्था सचिव बळीराम भिंगोले गुरुजी, कोषाध्यक्ष अंकुशराव कानवटे, शिरूर ताजबंदचे माजी सरपंच साहेबराव जाधव, अहमदपूर येथील शिक्षण संस्थेचे संचालक किशनराव बेंडकुळे, किनगाव येथील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विठ्टल बोडके, नळेगाव येथील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बब्रुवान जाधव, विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक डॉ. प्रदीप देशमुख, अ विभागाचे सचिव अनिरुद्ध बिरादार, ब विभागाचे सचिव डॉ. मनोज रेड्डी, क विभागाचे सचिव आश्विन बोरीकर, ड विभागाचे सचिव मीनानाथ गोमचाळे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गणपतराव माने, धर्मपाल गायकवाड, निवृत्ती कांबळे, शिवाजीराव खांडेकर, माधव जाधव, सय्यद इलियास, प्राचार्य डॉ. संजय वाघमारे, प्राचार्य डॉ. शेषेराव धोंडगे, क्रीडाप्रेमी श्रीधर पोतदार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी पत्रकार बाबुराव श्रीमंगले, बालाजी पडोळे, चंद्रशेखर तोगरे, धर्मपाल सरवदे, विविध महाविद्यालयातून आलेले संघ व्यवस्थापक, संघ मार्गदर्शक आणि खेळाडू मुले, मुली मोठ्यासंख्येने उपस्थित होते. सदरील स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच आजी माजी खेळाडूंनी परिश्रम घेतले.

About The Author