संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे यश

संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे यश

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाची श्रीजल बालाजी नवलागिरे या विद्यार्थीनी ची जवाहर नवोदय विद्यालय लातूर साठी दुसऱ्या यादीत निवड झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी शहरी भागातून विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथे सहावी वर्गात प्रवेश घेतला आहे. या विद्यार्थ्यांना सविता पाटील, सतीश साबणे, शारदा तिरुके, त्रिगुणा मोरगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल संस्थाध्यक्ष तथा भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे, मानसी ताई हाके, मीनाताई देवकते, कौशल्या कांबळे, सुरेंद्र चाकूरकर, जनार्धन गायकवाड, रमेश हाके, संस्था समन्वयक कुलदीप भैय्या हाके, अमरदीप हाके, मुख्याध्यापिका आशा रोडगे मुख्याध्यापक उद्धव शृंगारे, मुख्याध्यापक परमेश्वर पाटील सह पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

About The Author

error: Content is protected !!