संघर्षातून कुटुंबाला उभारणी देणाऱ्या महिलांचे कार्य प्रेरणादायी – गोपाळ आंधळे
परळी (गोविंद काळे) : कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचे निधन झाल्यानंतर आपल्या आपत्यांचा सांभाळ करत शिक्षण पालन-पोषण अशी जबाबदारी पार पाडत संघर्षातून कुटुंबाला उभारणी देण्याचे प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांचे कार्य हे समाजाला संघर्षातुन मार्ग काढत जगण्यासाठी प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन नगर परिषदेचे शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी केले.
परळी नगर परिषदेच्या वतिने महिला दिनानिमीत्त राज्याचे सामाजिक न्याय विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे साहेब व न.प. गटनेते वाल्मीक आण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. 8 मार्च रोजी संघर्षातुन कुटुंब सांभाळत आदर्श निर्माण करणार्या महिलांचा त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जावुन सन्मान करण्यात आला. परळी शहरात आज अनेक महिला आपल्या कुटुंबाला आधार बनल्या आहेत. काही महिला पतीच्या निधनानंतर खचून न जाता दुःख पोटात साठवून आपल्या चिमुकल्यांचा सन्मानाने सांभाळ करत आहेत. परळी शहर पोलीस ठाण्यासमोर गंगाबाई पांडुरंग धाकपाडे या चहाची टपरी टाकून अनेक वर्षापासून व्यवसाय करत आपल्या मुलींचे विवाह केले व आजही आपले कुटुंब सांभाळत आहेत तर श्रीमती मीना रोशन खरे या महिलेने पती निधना नंतर पशुधनाचा साज विकून आपल्या पाच लेकरांचा सांभाळ करत सर्वांचे शिक्षण पूर्ण केले यामध्ये एक मुलगी एम.बी.ए. शिक्षण पूर्ण केले त्या परिस्थितीचा सामना करून कुटुंबाचा आधारवड ठरल्या त्यांच्या कार्याला सलाम करत आज महिला दिनाचे औचित्य साधून न.प.शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी शाल,पुष्पगुच्छ आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाची प्रतिमा भेट देऊन सन्मान केला. यावेळी शिक्षण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम,जमादार भास्कर केंद्रे ज्येष्ठ पत्रकार संजय खाकरे पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी मुंडे सामाजिक कार्यकर्ते भागवत कसबे,महादेव गीत्ते आदी उपस्थित होते.