तलवारबाजी मध्ये महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पटकावली सात पदके
अहमदपूर (गोविंद काळे) : नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने भाई किशनराव देशमुख महाविद्यालय चाकूर येथे पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन ‘ब’ विभागीय तलवारबाजी स्पर्धेत येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सात पदके पटकावून यशाचा झेंडा फडकविला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत ब विभागीय क्रीडा स्पर्धा चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात नुकत्याच पार पडल्या असून, यातील तलवारबाजी या क्रीडा प्रकारात महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकूण सात पदके पटकावली आहेत. बी. ए. प्रथम वर्षाची विद्यार्थीनींनी कु. प्रज्ञा रायभोळे हिने फाॅईल प्रकारात, बी. ए. तृतीय वर्षाच्या कु. विश्वनंदा नंदवंशी हिने फाॅईल प्रकारात, बी.ए. द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी कु. कांचन गुट्टे हिने इप्पी या प्रकारात तर कु. मनीषा सुरनर हिने सायबर प्रकारात पदके पटकावली. तसेच मुलांच्या तलवारबाजी स्पर्धेत शेख अल्ताफ, व अमोल बनसोडे यांना फाॅईल प्रकारात पदक मिळाले. या सर्व विद्यार्थ्यांनी तलवारबाजीच्या विविध प्रकारात सात कांस्यपदक मिळविली.
सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख प्रो. डॉ. अभिजीत मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडूंचे महाविद्यालयाचे व मार्गदर्शकांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी व प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी यांनी तसे प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.