आम आदमी पार्टीचा विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा व धरणे आंदोलन
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील आम आदमी पार्टीच्या वतीने तालुक्यातील शेतकरी शेतमजुर व शहरातील नागरीकांच्या विविध समस्या घेऊन दि 21 नोव्हेंबर रोजी शहरातुन मोर्चा काढून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे
याविषयी सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील शेतकरी , शेतमजुर व शहरातील नागरीकांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी आम आदमी पार्टी अहमदपूर तालुक्याच्या वतीने दि 21 नोव्हेंबर रोजी अहमदपूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या शेतीचे विध्दुत बिलासाठी विध्दुत पुरवठा खंडीत करण्यात येवू नये, शेतीचे वीजबिल माफ करावे, अहमदपूर शहरात शौचालय व मुतारीची सोय करावी, सन 2019ते 2022 या वर्षात ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी 80% अनुदान जाहीर केले असताना 55℅ ने वाटप चालू आहे ते अनुदान 80% ने वाटप व्हावे, गाव तेथे सार्वजनिक स्मशानभूमी योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी, अहमदपूर शहरात नवीन पाईपलाईन करून देखील 15/20 दिवसानी पाणी पुरवठा होत आहे. तो पाणी पुरवठा दररोज करावा आदीसह या सर्व बाबींचा शासनाने गांभीर्यपुर्वक विचार करावा व जनतेची गैरसोय दुर करावी अन्यथा आम आदमी पार्टी, सहारा मित्र मंडळ आणि शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढुन धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार यांना देण्यात आला आहे सदरील निवेदनावर आप तालुका अध्यक्ष मनोहर पाटील सचिव सुधाकर चोले सहारा मित्र मंडळ अध्यक्ष अजिम पटेल शेतकरी संघटना हनमंत आरदवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.