राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने अब्दुल सत्तरांचा निषेध

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने अब्दुल सत्तरांचा निषेध

अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विषयी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले वक्तव्य अतिशय संतापजनक आहे. या वक्तव्याचा जाहीर निषेध म्हणून आज राष्ट्रवादी युवती व राष्ट्रवादी महीला काँग्रेस यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनावर राष्ट्रवादी महीला जिल्हाध्यक्ष मीनाक्षीताई शिंगडे राष्ट्रवादी युवती काँग्रेस तालुकाध्यक्ष सुप्रियाताई चंद्रशेखर भालेराव शहराध्यक्ष शिवानी कदम नगरसेविका अनुराधाताई नलेगवकर महिला तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेविका शाहूताई कांबळे माजी नगरअध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे गौतमी भालेराव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

About The Author

error: Content is protected !!