प्राचार्य डॉ वसंत बिरादार यांना डी.लिट मुळे नांदेड जिल्ह्याच्या लौकिकात भर
लोह्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी यांचे प्रतिपादन
लोहा (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक तथा लोह्याचे ज्येष्ठ पत्रकार महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांना अमेरिकेतील नामांकित सेंट्रल विद्यापीठाने ‘ डी. लिट्.’ ही मानाची पदवी देऊन गौरविण्यात आल्याबद्दल लोह्यासह नांदेड जिल्ह्याचा लौकिकात भर पडली आहे असे प्रतिपादन लोह्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी यांनी केले.
लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी यांनी प्राचार्य डॉ वसंत बिरादार यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते.पुढे ते म्हणाले की,प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांनी महाराष्ट्रातील ‘दै. लोकमत’ या नामांकित वृत्तपत्रातून व आता ‘दै. वतनवाला’ मधून सातत्याने पंचवीस वर्षे सामान्यांना न्याय मिळवून देणारी समाजोपयोगी व शोधपत्रकारिता केली. तसेच विपुल साहित्यनिर्मिती केली याची दखल घेऊन अमेरिकेन सेंट्रल विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही पदवी प्रदान केली आहे.ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे म्हणून शाल, पुष्पहार देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी नगरसेवक संदीप दमकोंडवार, नगरसेवक नबी शेख, संजय रहाटकर, पत्रकार टिकाराम कतरे,गुलाम शेख आदिंची उपस्थिती होती.