पाणीपुरवठ्याचे कामे दर्जेदार व वेळेत पुर्ण करा : आ.संजय बनसोडे

पाणीपुरवठ्याचे कामे दर्जेदार व वेळेत पुर्ण करा : आ.संजय बनसोडे

लातूर (एल.पी.उगीले) : उदगीर विधान सभा मतदार संघातील बहुतांश भाग हा डोंगरी भाग असुन अनेक गावामध्ये आजही पाणीटंचाई असल्या कारणाने प्रत्येक वेळी उन्हाळ्यामध्ये ग्रामीण भागातील ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी वन – वन भटकावे लागते. ग्रामीण भागातील ग्रामस्थांना मुबलक व स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी शासनाच्या विविध 148 योजनेमधून प्रत्येक कुटुंबाला पाणी देण्याचा निर्धार केला आहे. त्यामध्ये उदगीर – जळकोट मतदारसंघातील 140 गावांसाठी पाणीपुरवठ्याची योजना मंजूर केली आहे. सदर पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरु करा. व संबंधीत पाणीपुरवठ्याचे काम दर्जेदार करण्याच्या सुचना माजी पाणीपुरवठा मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
ते लातूर येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजीत पाणीपुरवठ्यासंबंधी आयोजीत बैठकीत अधिकाऱ्यांना सुचना देत होते.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष मंजुरखाँ पठाण, माजी उपनगराध्यक्ष फैजुखाँ पठाण, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, माजी नगरसेवक शमशोद्दीन जरगर, मादलापुरचे सरपंच उदयसिंह मुंडकर, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी पाणीपुरवठा मंत्री आ.संजय बनसोडे यांनी, जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत व वाटरग्रीड योजनेच्या माध्यमातून उदगीर – जळकोट मतदार संघातील १४० गावांसाठी १४८ योजनेच्या माध्यमातून जवळपास ७७० कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे मतदार संघातील लहान – मोठ्या गावासह वाडी तांड्यावर देखील आता पाणीटंचाई भासणार नाही याची दक्षता घेवुन सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे. संबंधित काम हे ठेकेदाराकडुन दर्जेदार व दिलेल्या कालावधीत पुर्ण करुन घेण्याच्या सुचना देवून प्रत्येक गाव निहाय आढावा घेतला.
या पाणी पुरवठा योजनेची तांत्रीक मान्यता व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असुन १४० योजनेच्या माध्यमातून मार्च – २०२४ अखेर मतदार संघातील सर्व कामे पूर्ण होणार असून तात्काळ काम सुरू करण्याच्या सुचना आ.बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
यावेळी ग्रामीण विभाग जिल्हा परिषद लातूरचे कार्यकारी अभियंता शेलार बी.आर.,उदगीर – जळकोटचे उप अभियंता गर्जे एस.पी., महाराष्ट्र जीवन प्राधिकारणचे कार्यकारी अभियंता कायंदे एस. व्ही. यांच्यासह सर्व तालुका स्तरीय अभियंत्यांची गाव निहाय आढावा बैठक घेण्यात आली.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!