संविधानानेच प्रत्येक भारतीयाला ‘माणूस’ म्हणून जगण्याचे अधिकार दिले
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लालबहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन व विशेष परिपाठ सादरीकरणातुन भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.
समता, न्याय, अहिंसा, बंधुता या तत्वाव्दारे देशाचे सार्वभौमत्व अखंडीत ठेवणारे भारतीय संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी अंगीकृत व अधिनियमित करण्यात आले. तो दिवस संविधान दिन म्हणुन साजरा करत असतांना इ.दहावीच्या विद्यार्थ्यांनी विष्णू तेलंग यांच्या मार्गदर्शनान्वये विषयानुरुप परीपाठाचे सादरीकरण केले.याप्रसंगी मंचावर अध्यक्ष स्थानी उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड ,प्रमुख वक्ते संतोष गजलवार,पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले ,बलभीम नळगीरकर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख वक्ते संतोष गजलवार म्हणाले,”भारतीय संविधानानेच प्रत्येक भारतीयाला ‘माणूस’ म्हणून जगण्याचे अधिकार तर दिलेच पण सोबतच देशाप्रती जागरूक, जबाबदार असण्याची जाणीवही दिली.
अध्यक्षीय समारोपात अंबादास गायकवाड म्हणाले,”भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरीकांच्या मूलभूत हक्क, कर्तव्ये, अधिकार आणि जबाबदाऱ्या यांची दिशा ठरविणारा ऐतिहासिक ग्रंथ आहे. आपल्या प्रदीर्घ अभ्यास आणि चिंतनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आदर्श संविधान लिहून या देशावर अनंत उपकार केले आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभ्यासपुरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार,प्रमुख पाहुण्यांचा परिचय व स्वागत श्रीमती छाया दिक्कतवार यांनी करून दिला, तर सूत्रसंचालन श्रीमती लक्ष्मी चव्हाण यांनी केले.श्रीमती आशा कल्पे यांनी आभार मानले .कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक बाबुराव आडे,पर्यवेक्षक माधव मठवाले,विनायक इंगळे,कार्यक्रम प्रमुख श्रद्धा पाटील व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.