जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल आढावा बैठक उदगीर येथे संपन्न

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल आढावा बैठक उदगीर येथे संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जानबा मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत उदगीर येथे इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या सभागृहात लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाची आढावा बैठक संपन्न झाली.

यावेळी राष्ट्रवादीचे उदगीर तालुकाध्यक्ष तथा पंचायत समितीचे माजी सभापती डाॅ. शिवाजी मुळे, उदगीर विधानसभा अध्यक्ष प्रा. प्रवीण भोळे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर पाटील, सेवादलाचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष कैलास पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आगामी होणारे निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पक्ष कार्यकर्त्यांनी कामाला लागावे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुरोगामी विचार घराघरांमध्ये पोहोचवून, येणाऱ्या काळामध्ये पक्ष सत्तेत येण्यासाठी तळागाळातील सामान्य माणसाला प्रोत्साहन द्यावे असे विचार सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जानबा मस्के यांनी व्यक्त केले. लातूर जिल्ह्यात कैलास पाटील यांनी चांगल्या प्रकारे संघटन केले आहे, हे कौतुकास्पद आहे. सेवादलाचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी लातूर जिल्ह्याचा आढावा दिला व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते धनाजी बनसोडे यांनी केले तर आभार रामचंद्र गायकवाड यांनी मानले. यावेळी लातूर जिल्हा रा. काँ. सेवादलची नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली व या निवडीचे नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पप्पू पाटील गुरधाळकर, रामचंद्र गायकवाड, सिद्धार्थ सूर्यवंशी, विद्यासागर हैबतपूरे, विष्णूकांत राजगौंड, रामेश्वर जाधव, तुळशीदास वाघमारे, महमंद रफी पटेल, परमेश्वर तीरकमटे यांच्यासह लातूर जिल्ह्यातील सेवादलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author