हिवरा येथे तीन दिवस जनता कर्फ्यु
हिवरा येथील कोरोना रुग्णाची संख्या आठ वर
महागाव (राम जाधव) : यवतमाळ जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस सातत्याने वाढत आहे. त्यातचतालुक्यातील मुख्यबाजारपेठ असलेल्या हिवरा संगम कोरोना रुग्ण संख्येच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरत असून ग्रामपंचायत हिवरा तसेच अप्पती व्यवस्थापन समितीने हिवरा संगम येथे तीन दिवस जनता कर्फ्युची घोषणा केली असून 12 ते 14 मार्च या दरम्यान कर्फ्यु राहणार असून फक्त दवाखाने व मेडीकल सुरू राहणार आहेत. हिवरा संगम येथे सध्या कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. हिवरा येथे आठ कोरोना रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात 318 च्या वर कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यापैकी हिवरा गावातील वाढती रुग्ण संख्या पाहता कठोर पाऊले उचलावी लागतील,असे सूतोवाच अप्पती व्यवस्थापन तसेच ग्रामपंचायतच्या वतीने केले होते आहे.दरम्यान हिवरा सर्कलचे जि प सदस्य विलासराव भुसार, सरपंच सौ मेघा बोरूळकर, उपसरपंच शरद पाटील, पोलीस पाटील प्रवीण कदम, विजयराव बोंपिलवार, भगवान फाळके, सदस्य राजू धोतरकर, तलाठी शेख, कोतवाल जीवन जाधव, सुधीर कदम, स्वप्नील बेलखेडे, राजू गिरी, राम जाधव, समिती स्वयंसेवक विजय कदम तसेच व्यापारी असोसिएशन यांच्या चर्चा नंतर कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गावात १२ते १४ मार्च रोजी जनता कर्फ्युचे नागरिकांनी पालन करावे तसेच नागरिकांनी दिलेल्या नियमाचे पालन करावे असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
हिवरा गावात कोरोनाचे रुग्ण वाढत असून ही गंभीर बाब असून वाढत्या कोरोना रुग्ण परिस्थितीवर प्रभावी उपाययोजना म्हणून समितीने ‘तीन दिवस जनता कर्फ्यु’ हा निर्णय घेतला आहे तरी नागरिकांनी अप्पती व्यवस्थापन समिती व आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे-(मा विलासराव भुसारे जि प सदस्य हिवरा सर्कल)