संविधान दिनानिमित्त आयोजित ‘संविधान गुणगौरव परीक्षा 2022’ उत्साहात

संविधान दिनानिमित्त आयोजित ‘संविधान गुणगौरव परीक्षा 2022’ उत्साहात

लातूर (एल.पी.उगीले) : श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व समाजकार्य विभाग, संविधान गुणगौरव समिती आणि समाज कल्याण सहायक आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी ‘संविधान गुणगौरव परीक्षा 2022’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 176 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे उद्घाटन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड होते. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव, समाजकार्य विभाग प्रमुख डॉ. दिनेश मौने, केंद्रप्रमुख कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले, सह केंद्रप्रमुख डॉ. संजय गवई यावेळी उपस्थित होते.

संविधान गुणगौरव परीक्षेसाठी 191 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती, त्यापैकी 176 विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला. या परीक्षेच्या माध्यमातून समाजामध्ये संविधानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी, असे मत संविधान गुणगौरव परीक्षेचे संयोजक दीपरत्न निलंगेकर यांनी व्यक्त केले.

गुणगौरव परीक्षा यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवप्रसाद डोंगरे, डॉ. विनायक वाघमारे, प्रा. व्यंकट दुडीले, प्रा. किसनाथ कुडके, प्रा. दयानंद टेकाळे, प्रा. देविदास वसावे, डॉ. घनश्याम ताडेवाड, नरेश वाडकर, रघुनाथ शिंदे, नंदू काजापुरे, शुभम बिरादार, रमेश राठोड, बालाजी डावकरे यांनी सहकार्य केले.

About The Author