नेत्ररोग निदान शिबीर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेतल्यामुळे बालिका मुळे यांचा सत्कार

नेत्ररोग निदान शिबीर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेतल्यामुळे बालिका मुळे यांचा सत्कार

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर येथील उदगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाच्या वतीने समाजातील गोरगरीब नागरिकांना आर्थिक दृष्ट्या दारिद्र्यामुळे डोळ्यांचे उपचार करणे शक्य होत नसल्याने, वेगवेगळ्या गावांमध्ये शिबिरे घेऊन अत्यल्प शुल्का मध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे कार्य सुरू केले आहे. “अंधत्व मुक्त गाव” ही संकल्पना घेऊन उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर रामप्रसाद लखोटिया हे जीवाचे रान करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमध्ये खारीचा वाटा म्हणून शिक्षक काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्ष, उपक्रमशील शिक्षिका बालिका मुळे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरे घेऊन वयोवृद्धांना दृष्टी देण्याचे काम केले आहे. हे कार्य समाजातील इतरांना प्रेरणा देणारे असल्याने, प्रतिनिधिक स्वरूपामध्ये शिबिर संयोजक या नात्याने त्यांचा गौरव आणि सत्कार उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाच्या वतीने माजी गृहमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे, उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर रामप्रसाद लखोटिया, ह भ प निरंजन भाईजी महाराज इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लायन्स नेत्र रुग्णालयाचे पी आर ओ गणेश मुंडे, रवी जावळे, फैयाज फारुखी, जावेद मणियार, विष्णू पवार, सौरभ गादेवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!