बापू – सुधा काळदाते प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी डॉ. मुणगेकर यांचे व्याख्यान

बापू - सुधा काळदाते प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी डॉ. मुणगेकर यांचे व्याख्यान

लातूर (एल.पी.उगीले) : बापू – सुधा काळदाते प्रतिष्ठानच्यावतीने गुरुवारी (ता. एक डिसेंबर) ज्येष्ठ शिक्षण, अर्थतज्ञ व माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे लातूर येथील पूर्णानंद मंगल कार्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

लातूर विधानसभा निवडणुकीत १९६७ साली ऐतिहासिक विजय मिळवून सुरू केलेल्या आपली राजकीय कारकीर्द सुरू केलेले डॉ. बापूसाहेब काळदाते यांची कायम लातूरशी नाळ जोडलेली होती. डॉ. बापूसाहेब काळदाते यांच्या जन्मदिनी ता. एक डिसेंबर रोजी व्याख्यान आयोजित करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत ‘नोट बंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम’ या विषयावर डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे व्याख्यान एक डिसेंबर २२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पूर्णानंद मंगल कार्यालयात आयोजित करण्याचे ठरले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते ॲड. धनंजय पाटील असतील.

या बैठकीस संयोजन समितीचे अशोक गोविंदपुरकर, शिवाजीराव शिंदे, ॲड. मोहनराव पाटील, ॲड. वसंत उगले, अरविंद कांबळे, प्रा. सुधीर देशमुख, प्रा. सुधीर अनवले, कॉ. विश्वंभरराव भोसले, ॲड. आर. के. चव्हाण, प्रा. दत्ता मुंडे, प्रतिष्ठानचे सचिव ॲड. सुनील काळदाते, रणजित खंदारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author