अहमदपूर पोलीस ठाण्यात अवैध गर्भपाताचा गुन्हा दाखल!
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुका समुचीत प्राधिकारी यांना डॉ.किनगावकर यांच्या हास्पिटल एम टी पी सेंटरमध्ये अवैध गर्भपात केल्याची नोंद आढळुन आली.तसा अहवाल त्यांनी सिव्हील सर्जन लातूर यांना सादर केला.सिव्हीलने तपासणी पथक तयार करून सदर हास्पीटलची तपासणी केली असता शासनाने घालून दिलेल्या नियमांचे वैद्यकीय गर्भपात एमटीपी कायद्याचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले.यासंदर्भात डॉ.किनगावकर यांच्या विरोधात अहमदपूर पोलीस ठाण्यात दि.२५ रोजी अवैध गर्भपाताचा गुन्हा नोंद झाला आहे.
या विषयी पोलीस सुत्रांकडून समजलेली अधिकृत माहिती अशी की,तक्रारदार दत्तात्रय कालीदास बिराजदार वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय अहमदपूर हे अहमदपूर तालुका समुचित प्राधिकारी असल्यामुळे दि.१५/०२/२०२२ रोजी डॉ.किनगावकर यांच्या हास्पीटल एमटीपी सेंटरला भेट दिली.तेथे त्यांना अवैध गर्भपात केले असल्याची नोंदी आढळून आल्या.तद्नंतर त्यांनी सिव्हील सर्जन लातूर यांना तसा अहवाल सादर केला.त्यामुळे सिव्हील सर्जनने एक तपासणी पथक तयार करुन पुन्हा किनगाव कर हास्पीटलची तपासणी केली.सदर तपासणीअंती त्यांना तेथे २०१४ ते २०२२ च्या दरम्यान शासनाने घालून दिलेले नियमांचे वैद्यकीय गर्भपात एमटीपी कायद्याचे उल्लंघन करुन, बेकायदेशीर रित्या गर्भपात केले असल्याचे निष्पन्न झाले.यावरुन डॉ.किनगावकर यांच्या विरुध्द अहमदपूर पोलीस ठाण्यात गु.र.नं.५४५/२०२२ कलम ३(२)(A)(B)वैद्यकीय गर्भपात अधिनियम १९७१ नुसार दि.२५ नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड हे करत आहेत.