आबासाहेब इंग्लिश स्कूल देवणी येथे संविधान दिन साजरा

आबासाहेब इंग्लिश स्कूल देवणी येथे संविधान दिन साजरा

देवणी (एल.पी.उगीले) : देवणी येथील आबासाहेब इंग्लिश स्कूलमध्ये संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. व संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. संविधानाविषयी घोषवाक्य स्पर्धा ठेवण्यात आली होती. त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

अभ्यासिकेचेही आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे अभ्यासिकेत भाग नोंदवून शांतपणे पुस्तक वाचन केले.विद्यार्थ्यांना संविधानाविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. व संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आबासाहेब इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य सुप्रिया कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून विजयकुमार भोजने, आबासाहेब निवासी वस्तीगृहाचे गृहप्रमुख विश्वनाथ बिरादार व वैष्णवी बिरादार व आबासाहेब इंग्लिश स्कूलचे उपप्राचार्य डॉ. सत्यवान सोनटक्के , यावेळी रणजीत गायकवाड, अखिल शेख, विक्रम गायकवाड ,भीमराव महाके, मोहसीन शेख ,सुवर्ण सोनटक्के, प्रतीक्षा सूर्यवंशी, नेहा शेख , सभा सय्यद, रेखा आडे ,सुवर्णा होळकर, जयश्री माने इत्यादी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश आंबेनगरे व रेणुका पतंगे यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका मंडळे तर आभार स्वाती कोयले यांनी केले.

About The Author