रामाच्या कृपेने भाकसखेड्यात नामदेव व माधव ला तब्बल सतरा वर्ष 11 महिने नंतर भेटला रस्ता

रामाच्या कृपेने भाकसखेड्यात नामदेव व माधव ला तब्बल सतरा वर्ष 11 महिने नंतर भेटला रस्ता

हेर (एल.पी.उगीले) : सर्वसामान्य माणसांचे जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या छोट्या छोट्या प्रसंगातून समाधान आणि शांती त्याचा शोध घेणारा अधिकारी आल्यास जनतेच्या मनामध्ये आनंदाचे वारे व्हायला “गॉड इन स्मॉल थिंग”या जगत विख्यात पुस्तका मानवी जीवनातील परमेश्वर कसा असतो. दाखवून दिले आहे, त्याचे जिवंत उदाहरण उदगीर तालुक्यातील भाकसखेडा गावातील शेतकरी नामदेव प्रल्हाद जाधव व माधव प्रल्हाद जाधव यांना शेतीकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे शेती असून उत्पन्न नव्हते, २० व्यक्तीचे कुटुंब तब्बल १८ वर्षे अत्यंत हालक्याचे जिवन जगत होते. त्यांना तब्बल १७ वर्षे ११ महिने नंतर उदगीरचे कर्तव्यदक्ष सर्वसामान्यांच्या समस्या सोडविणारे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी रस्ता करुन न्याय दिला. म्हणूनच म्हणावे वाटते “नामदेव, माधव ला तब्बल १७ वर्षे ११ महिने नंतर राम कृपेने भेटला रस्ता!”

भाकसखेडा गाव देवर्जन मध्यम प्रकल्पात गेल्यापासून येथील शेतकरी नामदेव प्रल्हाद जाधव व माधव प्रल्हाद जाधव यांना त्यांच्या गट नंबर 179 ला जाण्यासाठी रस्ता त्यांचे चुलत भाऊ गट नंबर 175 व 176 मधील शेतकरी बालाजी नागोराव जाधव व कै. मोहन नागोराव जाधव त्यांचा मुलगा तातेराव मोहन जाधव यांनी रोखला होता. व शेती पडिक ठेवण्यास भाग पाडले होते. नामदेव व माधव हे वारकरी सांप्रदयीक असल्यामुळे रितसर रस्ता मिळावा म्हणून तहसीलदार उदगीर यांचेकडे दि.२४/१२/२००४पासून सतत अर्ज देऊन न्याय मागत होते, परंतु त्यांची दखल कोणी घेतली नव्हती. परंतु रामेश्वर गोरे हे तहसीलदार म्हणून उदगीर तालुक्यात आल्या पासून रस्ता, अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेऊन यशस्वीपणे जनतेचे प्रश्न मिटवण्यासाठी मार्ग काढत आहेत, प्रश्न निकाली काढत आहेत.

तहसीलदार रामेश्वर गोरे यांची समाजाभिमुख भूमिका आणि जनतेला न्याय द्यायची तळमळ असल्याचे पाहून दि.०३/०२/२०२१रोजी परत नामदेव व माधव यांनी अर्ज केला. त्याची दखल घेऊन रामेश्वर गोरे यांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या कडून अहवाल मागविला, व दिनांक१७/०८/२०२१ रोजी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 मधील प्राप्त अधिकारानुसार आदेश पारित केला. या आदेशाला अपिल झाले प्रवीण मेंगशेट्टी उपविभागीय अधिकारी यांनी दि.२१/०२/२०२२ रोजी प्रकरण फेर चौकशीसाठी तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्याकडे पाठवले. त्यानंतर तहसीलदार यांनी स्वतः दि. २३/०६/२०२२ रोजी संपूर्ण शेती फिरून स्थळ पहाणी केली व दि.१७/०७/२०२२ रोजी मामलेदार कोर्ट कायद्यानुसार शेतीकडे जाण्यासाठी रस्त्याचा आदेश पारित केला. सदर आदेश झाल्यानंतर या आदेशाच्या विरोधात न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले. मात्र न्यायालयाने तहसीलदार यांचा आदेश कायम ठेवल्याने तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी त्रिंबक मुसळे,तलाठी अंकुश वडगावे , पोलिस जमादार रमेश कांबळे, पोलीस शिपाई माधव वच्चे , पोलीस शिपाई संध्या जोशी, पोलीस शिपाई मोमीन यांनी तहसीलदार रामेश्वर गोरे व पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता मोकळा करून दिला. यावेळी संबधीत शेतकरी यांच्या कुटुबातील व्यक्तीच्या चेहरावर आनंद ओसांडून वाहत होता. त्यांनी सर्वांचे आभार मानले. कर्तबगार आणि समाजाचे हित जाणणारे अधिकारी आल्यास जनतेमध्ये समाधानाचे वारे कसे वाहते याचे जिवंत उदाहरण म्हणून या प्रकरणाकडे पाहता येऊ शकेल!

About The Author