लालबहादुर शास्त्री विद्यालयात महात्मा फुले स्मृती दिन साजरा

लालबहादुर शास्त्री विद्यालयात महात्मा फुले स्मृती दिन साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लालबहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात महात्मा फुले स्मृती दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड उपस्थित होते तर प्रमुख अतिथी पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर ,प्रमुख वक्ते केदार वाघमारे मंचावर उपस्थित होते.महात्मा फुले यांच्या प्रतिमापुजनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी प्रमुख वक्ते केदार वाघमारे ज्योतिबा फुलेंचा जीवनप्रवास सांगताना म्हणाले,” ज्योतिबा ते महात्मा असा खडतर प्रवास करणारे फुले हे जनतेची मानसिक गुलामगिरी संपवणारे प्रकाशदूत होते.” अध्यक्षीय समारोपात अंबादास गायकवाड म्हणाले,” फुले हे केवळ बोलके सुधारक नसून कर्ते सुधारक होते.समाजातील शोषित व उपेक्षित घटकांसाठी महात्मा फुले यांनी शिक्षणाचे प्रकाशदार दिले .फुले दाम्पंत्याच्या आजोड कार्यानेच आज स्त्रिया मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहेत.”

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिता यलमटे यांनी केले तर सूत्रसंचालन लक्ष्मी चव्हाण यांनी केले.पाहूण्यांचे स्वागत व परिचय प्रिती शेंडे यांनी केले तर आभार आशा कल्पे यांनी मानले. वैयक्तिक गीत चि.आदित्य वकिल तसेच शांतीमंत्र किरण नेमट यांनी गायले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक बाबुराव आडे,अभ्यासपूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार ,कार्यक्रम प्रमुख आशा कल्पे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About The Author