रामदेव बाबाच्या वक्त्व्याचा निषेध, श्रध्दा वालकरच्या आरोपीला कठोर शिक्षा दयावी

रामदेव बाबाच्या वक्त्व्याचा निषेध, श्रध्दा वालकरच्या आरोपीला कठोर शिक्षा दयावी

लातूर (प्रतिनिधी) : योगगुरू रामदेव बाबा यांनी ठाण्यातील कार्यक्रमात महिला बाबत अवमानकारकआणि बेताल वक्त्व्य केले. दिवसेदिवस महिला बाबत असेच प्रकार सुरू आहेत.हे थांबण्यासाठी योगगुरू रामदेव बाबा यांच्यावर गुन्हा दाखल करून अटककरावी. तसेच श्रध्दा वालकर हीची दिल्ली येथे निर्घूनपणे हत्या झाली असूनघटनेचा तपास तातडीने करून आरोपीला कठोर शासन करावे, अशा मागणीचे निवेदनलातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांना लातूर शहर जिल्हा काँग्रेसकमिटीच्या वतीने देण्यात आले.सोमवार दि. २८ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथेशहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनानिवेदन देण्यात आले. या निवेदनाव्दारे योगगुरू रामदेव बाबा यांनी ठाणेयेथील कार्यक्रमात महिलाचा अवमान करणारे बेताल वक्त्व्य केले या बददलत्यांच्यावर कार्यवाही व्हावी. तसेच श्रध्दा वालकरची निर्घून हत्या झालीआहे. या संदर्भात तातडीने तपास होऊन आरोपीला कठोर शासन करून न्याय मिळणेबाबत लातूर शहर मनपाच्या प्रथम महापौर, लातूर शहर जिल्हा काँग्रेसकमिटीच्या अध्यक्षा स्मिता खानापूरे, महाराष्ट्र महिला प्रदेश काँगेसकमिटी सरचिटणीस सपना किसवे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲड.किरण जाधव यांनी या प्रकरणी निवेदन देऊन त्यांच्या सोबत चर्चा केली.राज्यात आणि देशात भाजपचे सरकार आल्यापासून महिलावरील अत्याचार, अन्यायकरणाऱ्या घटनात वाढ झाली आहे असल्याचेही यावेळी सांगितले.योगगुरू रामदेव बाबा यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात महिला बाबतअवमानकारक वक्त्व्य केले. अशाच प्रकारातून राज्यासह देशभरात दिवसेदिवसमहिला बाबतचे असेच प्रकार सुरू आहेत. यापूढील काळात अशा अपप्रकाराला आळाबसावा यासाठी योगगुरू रामदेव बाबा यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी.तसेच दिल्ली येथे श्रध्दा वालकर हीची निर्घूनपणे हत्या झाली आहे. याप्रकरणात तातडीने तपास करून आरोपीला कठोर शासन करावे, अशा मागणीचे निवेदनलातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांना भेटून लातूर शहर जिल्हाकाँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आले आहे. महिलांना न्याय मिळावा यासाठीया दोन्ही प्रकरणी योग्य ती कार्यवाही करावी आणि महिलांना न्याय दयावा.केंद्रसरकार आणि राज्यसरकारने जर महिलांना न्याय दिला नाही तर काँग्रेसपक्षाच्या वतीने भविष्यात तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यातआला आहे.यावेळी लातूर शहर मनपाच्या प्रथम महापौर, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा स्मिता खानापूरे, महाराष्ट्र महिला प्रदेश काँगेसकमिटी सरचिटणीस सपना किसवे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षॲड.किरण जाधव, स्व्ंयप्रभा पाटील, रोजगार स्वंयरोजगार विभाग प्रदेशसरचिटणीस स्वाती जाधव पाटील, संजय निलेगावकर, महेश काळे, प्रा. प्रविणकांबळे, कमलताई शहापूरे, शिला वाघमारे, लक्ष्मी बटनपूरकर, कमलबाई मिटकरी,शितल मोरे, ज्योती सिंघन, वर्षा मस्के, उषा चिकटे, सुनंदा कांबळे, पदमीनसुर्यवंशी, आशा आयचित, पूजा होळकर, तनुजा कांबळे आदी उपस्थित होत्या.

About The Author