प्रभुराज प्रतिष्ठाण व नागरिक लातूरच्या वतीने पडलेलल्या खड्डयाला पुष्पहार घालूल स्वागत करून गांधीगिरी…
मनपा लातूर तुसी महान हो…शहर मे के खड्डे कब बुजाओगे “
लातूर (प्रतिनिधी) : उड्डाणपूल परिसरात प्रभुराज प्रतिष्ठाण व नागरिक, लातूरच्या वतीने बोलके फलक घेऊन गांधीगिरी…… लातूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज मार्गाकडे तसेच उड्डाणपुलाच्या बाजूस गांधी चौक, सिल्वरजुबली रोड सावेवाडी,राजीवगांधी चौक,नांदेड रोड, बार्शी रोड दयानंद कॉलेज परिसरात असे अनेक रस्त्याची अवस्था चाळणी सारखी झाली आहे या रस्त्याचा शहरातील जनता जास्त प्रमाणात वापर होतो त्यात असलेले खड्डे ही जनतेला त्रास दायक ठरत आहेत याची दुरुस्ति मनपा करत नसल्याने जनतेत रोष होत आहे.या रस्त्याचा वापर मनपा प्रशासन व अधिकारी ही करीत असतील तरीही या कडे त्यांचेही दुर्लक्ष होत आहे.तसेच गल्ली पासून मेन रोड प्रत्तेक ठीकानी खड्डेच खड्डे दीसून येतात याचा त्रास सर्व सामान्य जनतेस होतोच पण वाहनधारक खड्डा चूकवीन्या प्रयत्नात आपघातास समोरे जातो व शाररीक आजार मनक्याचा,पाठीचा कमरेच्या त्रासापासून नागरीक परेशान झाला आहे यात वीद्यर्थीनांही नोठा त्रास सहन करावा लागत आहे अत्यावश्यक सेवा रुग्नासाठी रुग्णवाहिका चालविण्यास व रुग्नाला वेळेवर दवाखान्यात दाखल करण्यास अडथळा येतो यासर्व बाबी बाबत मनपा च्या निदर्शनास आणून सुद्धा ऐकुन व न ऐकल्या सारखे, बघून न बघितल्यासारखे बोला म्हंटकी कि बोलता येत नाही या असे सोंग घेत नागरिकांच्या अश्या मूलभूत गरजा बाबत दूर्लक्ष करीत असून मनपा प्रशासन गांभीर्यने घेत नाही व जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे सदरील नागरिकांच्या जीवनाशी निगडित कामे मनपाच्या निदर्शनात आणण्याकरिता नागरिकांच्या वतीने “अँड. अजय कलशेट्टी” यांच्या नेत्रत्वात उड्डाणपूल परिसरात कानाला हात व डोळ्यावर हात तसेच तोंडावर हात असे सोंग करणाऱ्या प्रवत्ती चे बोलके फलक तसेच “मनपा लातूर तुसी महान हो…शहर मे के खड्डे कब बुजाओगे “असे बोलके फलक घेऊन मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.तसेच लातूर शहरातील खड्डे हे तात्पुरता मुरुमाने न बुजविता ते कायमस्वरूपी डांबरीकरणाच्या साह्याने बुजवावे अशी मागणी नागरिक करीत आहेत. यावेळी अँड.शिरीष धहीवाल,अँड.सूरेश सलगरे,हुसेन पठाण,अशोक पंचाक्षरी,अमर जाधव,विलास भूमकर,सचिन गोलावार, अशोक कांबळे, गोपाळ खंडागळे आदी उपस्थीत होते.