एनसीसी दिनानिमित्त राष्ट्रीय छात्र सेनेद्वारे उदयगिरी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात एनसीसी दिनानिमित्त राष्ट्रीय छात्र सेनेद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र बटालियन लातूरचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल संतोष कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे कंपनी कमांडर लेफ्टनंट डॉ.राम साबदे यांनी या शिबिराचे आयोजन केले. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित रक्त दाते छात्रसैनिकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के, प्रा.डॉ.के.आर.गव्हाणे, डॉ.बी.डी.करंडे, डॉ. विनय नागपुर्णे, डॉ.संजय सूर्यवंशी व कंपनी कमांडर डॉ.आर.पी.साबदे तसेच महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर व शिवाजी महाविद्यालय उदगीर चे सर्व छात्रसैनिक उपस्थित होते. बटालियनच्या वतीने नायब सुभेदार दिलीप शेंडगे व हवालदार सोहन सिंग हे उपस्थित होते. रक्तदान शिबिरात कंपनी कमांडर डॉ.आर.पी.साबदे, डॉ.प्रशांत माने, बटालियनचे दिलीप शेंडगे, सोहन सिंग आणि छात्रसैनिक असे एकूण 29 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथील रक्तपेढीचे वैद्यकीय कर्मचारी डॉ.वैभव देशमुख, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. नीरजा मोरे, निवासी डॉ.शेख मजहत, श्री.सूर्यवंशी, श्री.निखिल कोलते, श्री.बळीराम कांबळे, श्री.मिलिंद वाघमारे तसेच या महाविद्यालयातील श्री.नागनाथ बापूरे आणि श्री.राजू बोनवळे यांनी मोलाचे सहकार्य केले.