ज्योतिबांनी दिलेल्या स्त्री शिक्षणामुळेच आज मी तुमच्यासमोर उभी आहे – आशा मोरे
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था ,अंबाजोगाई द्वारे संचलित लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात आयोजित महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिनानिमित्त, प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.स्त्री शिक्षणासाठी समानता व सत्यासाठी देह झिजवणारे थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले एक थोर समाजसुधारक होते.एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते. म्हणून मुलींसाठी पहिली शाळा काढून शिक्षणाची दारे खुली केली. म्हणून आज प्रत्येक क्षेत्र मुलींनी पादाक्रांत केले आहे.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले तर, प्रमुख पाहुणे म्हणून आशा मोरे,मुख्याध्यापक बाबुराव आडे अभ्यासपूरक मंडळप्रमुख विनायक इंगळे उपस्थित होते. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. महात्मा फुले यांच्या जीवनातील प्रसंगावर नाटिका सादरीकरण व भित्तीपत्रिकाचे प्रकाशन करण्यात आले.अक्षरा दुरुगकर व दिव्या कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही .मानव सेवा हाच खरा धर्म. अशी शिकवण ज्योतिबांनी समाजाला दिली.त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड इत्यादी पुस्तके लिहून अन्यायाला वाचा फोडली. त्यांनी अंधश्रद्धा न बाळगता सत्यशोधनाचा पाया घातला.असे मार्गदर्शन अध्यक्षीय समारोपात लालासाहेब गुळभिले यांनी केले.
सूत्रसंचालन श्रीया महामुनी, प्रास्ताविक मयुरी वट्टमवार, स्वागत व परिचय तेजस्विनी केंद्रे, वैयक्तिक गीत शरयू पांचाळ यांनी गाईले..कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेश गौतम, अनिता मुळखेडे, नीता मोरे व सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.