कै. अशोकराव एकंबेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रिस्टाइनच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

कै. अशोकराव एकंबेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रिस्टाइनच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

अहमदपूर ( प्रतिनिधी ) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर चे माजी अध्यक्ष स्व. अशोकराव पाटील एकंबेकर उपाख्य दादा यांच्या स्मृतिदिना निमित्त राष्ट्रीय सेवा योजना व प्रिस्टाईन कंपनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष स्व. अशोकराव पाटील एकंबेकर उपाख्य दादा यांची महत्त्वाची भूमिका होती की, विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे आरोग्य चांगले असेल तर महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य निकोपपणे होते. त्यांच्या विचाराला अनुसरून प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी सर्वरोग निदान आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केले.

या शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. तर, विचार मंचावर पुणे येथील आयुर्वेदाचार्य डॉ. प्रवीण बडे यांच्या ‘प्रिस्टाईन’ या नामांकित असलेल्या आयुर्वेदिक कंपनीचे फंड अच्युव्हर गजानन मोरे, कल्याण जगदाळे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांच्यासह शिबिराचे संयोजक डॉ. पांडुरंग चिलगर, डॉ. सतीश ससाणे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे डॉ. संतोष पाटील यांची विचार मंचावर उपस्थिती होती. शिबिराच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे माजी अध्यक्ष स्व. अशोकराव पाटील एकंबेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले . तसेच अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास या विषयाच्या भिती पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गजानन मोरे व कल्याण जगदाळे यांनी स्कॅन मशीनच्या द्वारे महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी करून रोग निदान केले व त्यावरील उपचार सांगितले. या कंपनीने आतापर्यंत लाखो लोकांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना नवजीवन दिले आहे.

या शिबिराचे प्रास्ताविक एन. एस. एस. चे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर, सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे यांनी व आभार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या महाविद्यालयातील अभ्यास केंद्राचे एन.एस.एस. चे कार्यक्रमाधिकारी डॉ. संतोष पाटील यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author