शिवाजी महाविद्यालयात महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन
उदगीर (एल.पी.उगीले) : सत्याच्या वाटेवरती चालताना एकटे पडलात तरी चालेल, पण चुकीच्या पद्धतीने समर्थन करणाऱ्या गर्दीत मिसळू नका. हा मोलाचा संदेश देणारे व चार वाक्यात शिक्षणाचे महत्त्व सांगणारे थोर विचारवंत, लेखक, कवी ,स्त्रियांचे उद्धारकर्ते आणि समाज सुधारक सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक जाधव यांच्या हस्ते पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. सदरील कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना व जयंती समिती यांच्या वतीने घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती समिती प्रमुख प्रो डॉ. सुरेश शिंदे यांनी तर आभार कार्यक्रमाधिकारी प्रा.बालाजी सूर्यवंशी यांनी मानले .या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी ,शिक्षकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
