स्वामी रामदेवबाबा यांच्या वक्तव्याचा विपर्यास
मीनाक्षी स्वामी: समाजासाठी होणाऱ्या चांगल्या कार्यामध्ये अडथळा आणू नये
उदगीर (एल.पी.उगीले) : योगगुरू रामदेवबाबा स्वामी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. ते अत्यंत चुकीचे असल्याचे मत महिला पतंजली योग समितीच्या जिल्हा सहप्रभारी मीनाक्षी स्वामी यांनी व्यक्त केले आहे.
ज्या संघटनेमध्ये महिलांना अतिशय उच्च दर्जा दिला जातो. त्यांना मानसन्मानाने वागवले जाते. पूर्ण सुरक्षितता दिली जाते अशा पतंजली संघटनेचे मुख्य असलेले स्वामी रामदेवबाबा हे महिलांबद्दल अपशब्द काढूच शकत नाहीत असे ठामपणे सांगितले. स्वामी रामदेवबाबा यांचा बोलण्याचा अर्थ असा आहे की, खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करणाऱ्या महिला कोणत्याही वस्त्रांमध्ये चांगल्या दिसतात. साडीमध्ये, सलवार सूटमध्ये आणि त्यांनी जे सांगितले मेरे जैसा याचा अर्थ कटी वस्त्र जो संन्यासी महिलांचा ड्रेस कोड असतो. पतंजली योगपीठामध्ये आज ६०० भगिनी ब्रम्हचारीनी आणि संन्यासीनी या संन्यासी ड्रेस मध्ये संपूर्ण अंगभर वस्त्र परिधान करून रहात आहेत. महिलांचा मानसन्मान करून समाजात त्यांचा व त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा संकल्प स्वामीजींनी केला आहे आणि म्हणूनच या महिला महासंमेलनाला उपस्थित होते. मात्र स्वामीजींबद्दल गैरसमज पसरवण्यात येत आहे. आज त्यांच्यामुळे संपूर्ण भारतात १५ लाख भगिनी योगाचा, आयुर्वेदाचा, भारतीय संस्कृतीचा, स्वदेशीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व समाजाची सेवा करण्यासाठी बाहेर पडलेल्या आहेत. एखाद्या संघटनेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांनी बाहेर पडून भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार करणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे आणि याचे कारण स्वामीजीबद्दलचा विश्वास, त्यांच्यावरची श्रद्धा हे आहे. त्यामुळे कोणताही अपप्रचार करून अर्थाचा अनर्थ करून समाजासाठी होणाऱ्या चांगल्या कार्यामध्ये कोणीही अडथळा आणू नये अशी विनंती महिला पतंजलि योग समितीच्या लातूर जिल्हा सहप्रभारी मीनाक्षी स्वामी यांनी केले आहे.