शाल पुष्पहार नको, गरजूंसाठी रक्तदान करा! आमदार बाबासाहेब पाटील

शाल पुष्पहार नको, गरजूंसाठी रक्तदान करा! आमदार बाबासाहेब पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : ५ डिसेंबर रोजी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांनी “नका वाढदिवसाला शाल फुलांहारांचे वान जमलेच तर गरजूंसाठी करा रक्तदान’ II अशा प्रकारचे आवाहन आमदार बाबासाहेब पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

आमदार पाटील यांचा वाढदिवस शोबाजी, फटाक्यांचे आवाज काढत साजरा केला जात नाही. ते नेहमी म्हणतात सामाजिक बांधिलकी जपत किंवा सामाजिक उपक्रमाने साजरा व्हावा, असा माझा कायमच आग्रह असतो. तीन वर्षापूर्वी वाढदिवसानिमित्त भेट म्हणून आलेल्या ६५,००० हजार वह्या, पेनचे जिल्हा परिषद शाळेतील गरीब मुलां-मुलींना वाटप सामाजीक बांधिलकी जपण्यासाठी कोरोना संकटाच्या काळात रक्ताचा प्रचंड तुटवडा असताना वाढदिवसाचे निमित्त साधून रक्तदान करण्याच्या आवाहनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. सर्वांनी रक्तदान करीत हे संकट दूर करण्यासाठी आपण सर्वांनी मोलाचे योगदान दिले होते. या समाजाभिमुख उपक्रमात रक्तदान करून रक्तदानाचा महासंकल्प यशस्वी करूया ! रक्तदान रुपी शुभेच्छा आपण मला प्रदान कराव्यात, रक्तदान शिबीर दि.५ डिसेंबर रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० शिवछत्रपती नगर, इंद्रायणी निवासस्थान शिरूर ताजबंद येथे आयोजीत केल्याची माहीती पोलीस पोलीस फ्लॅश न्युज प्रतिनिधीशी बोलतांना आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिली.

About The Author

error: Content is protected !!