ग्रामपंचायत निवडणुक;सदस्यपदासाठी १०५६ उमेदवार तर सरपंचपदासाठी २४१ उमेदवार

ग्रामपंचायत निवडणुक;सदस्यपदासाठी १०५६ उमेदवार तर सरपंचपदासाठी २४१ उमेदवार

अहमदपूर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीची निवडणूक

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील ९७ ग्रामपंचायती पैकी मुदत संपलेल्या ४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सदस्य पदासाठी १०५६ उमेदवारांनी १०६९ आर्ज भरले आहेत तर सरपंच पदासाठी २४१ उमेदवारांनी २४७ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. तालुक्यातील शिवणखेड सदस्य पदासाठी २७ तर सरपंच ६, कुमठा सदस्य पदासाठी ३८, सरपंच ४, येस्तार सदस्य पदासाठी १९, सरपंच पदासाठी ३, लेंडेगाव सदस्य पदासाठी १३ व सरपंच पदासाठी ८ उमेदवार, मावलगाव सदस्य पदासाठी १५ तर सरपंच पदासाठी ५, सताळा सदस्य पदासाठी २६ तर सरपंच पदासाठी ८ उमेदवार, गुंजोटी सदस्य पदासाठी २५ तर सरपंच पदासाठी ५ उमेदवार, टाकळगाव सदस्य पदासाठी २४ तर सरपंच पदासाठी ६ उमेदवार, नागठाणा सदस्य पदासाठी १४ तर सरपंच पदासाठी ४ उमेदवार, गंगाहिप्परगा सदस्य पदासाठी २० उमेदवार तर सरपंच पदासाठी ४ उमेदवार सुमठाणा सदस्य पदासाठी १४ उमेदवार तर सरपंच पदासाठी ८ उमेदवार, रुद्धा येथे सदस्य पदासाठी २६ तर सरपंच पदासाठी ३ उमेदवार, देवकरा सदस्य पदासाठी ३३ उमेदवार तर सरपंच पदासाठी १० उमेदवार, कोळवाडी २४ सदस्य पदासाठी तर सरपंच पदासाठी ६ उमेदवार, दगडवाडी सदस्य पदासाठी २१ उमेदवार तर सरपंच पदासाठी ९ उमेदवार, कोपरा सदस्य पदासाठी २८ उमेदवार तर सरपंच पदासाठी ६ उमेदवार, मानखेड -सदस्य पदासाठी २२ उमेदवार तर सरपंच पदासाठी २ उमेदवार, रोकडा सावरगाव सदस्य पदासाठी ३४ उमेदवार तर सरपंच पदासाठी ८ उमेदवार, काजळ हिप्परगा – सदस्य पदासाठी २० उमेदवार तर सरपंच पदासाठी ४ उमेदवार, अंधेरी सदस्य पदासाठी ६१ उमेदवार तर सरपंच पदासाठी सहा उमेदवार, घसवाडी सदस्य पदासाठी २५ उमेदवार तर सरपंच पदासाठी तीन उमेदवार, शिदगी बु सदस्य पदासाठी अकरा उमेदवार तर सरपंच पदासाठी सात उमेदवार, सिदगी खुर्द सदस्य पदासाठी ऐकेवीस, तर सरपंच पदासाठी सात उमेदवार, सांगवी सुनेगाव सदस्य पदासाठी २० उमेदवार सरपंच पदासाठी सात उमेदवार, किनगाव सदस्य पदासाठी ६४ उमेदवार तर सरपंच पदासाठी सात उमेदवार, वायगाव सदस्य पदासाठी २६ उमेदवार तर सरपंच पदासाठी चार उमेदवार, बाभळदरा सदस्य पदासाठी सोळा उमेदवार सरपंच पदासाठी सात उमेदवार, सय्यदपुर सदस्य पदासाठी १४ उमेदवार तर सरपंच पदासाठी चार उमेदवार, उमरगा कोर्ट सदस्य पदासाठी २२ उमेदवार तर सरपंच पदासाठी दोन उमेदवार आजणी खुर्द येथे सदस्य पदासाठी ते- रा तर सरपंच पदासाठी सात उमेदवार, चोबळी येथे सदस्य पदासाठी १५ उमेदवार तर सरपंच पदासाठी सात उमेदवार, मांडणी सदस्य पदासाठी २२ उमेदवार तर सरपंच पदासाठी पाच उमेदवार, वळसंगी येथे सदस्य पदासाठी वीस उमेदवार तर सरपंच पदासाठी तीन उमेदवार, हिपळगाव येथे सदस्य पदासाठी २५ उमेदवार तर सरपंच पदासाठी सहा उमेदवार, विळेगाव येथे सदस्य पदासाठी २६ उमेदवार तर सरपंच पदासाठी पाच उमेदवार लांजी सदस्य पदासाठी १६ उमेदवार तर सरपंच पदासाठी नऊ उमेदवार, थोडगा सदस्य पदासाठी ३६ उमेदवार तर सरपंच पदासाठी चार उमेदवार, काळेगाव येथे सदस्य पदासाठी ४७ तर सरपंच पदासाठी १५ उमेदवार, शिरूर ताजबंद सदस्य पदासाठी ७२ उमेदवार तर सरपंच पदासाठी सहा उमेदवार, हाळणी येथे सदस्य पदासाठी सतरा उमेदवार तर सरपंच पदासाठी तीन उमेदवार, नांदुरा बुद्रुक येथे सदस्य पदासाठी दहा उमेदवार तर सरपंच पदासाठी एक उमेदवार तसेच नांदुरा खुर्द येथे सदस्य पदासाठी २४ उमेदवार तर सरपंच पदासाठी दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आसल्याची माहिती तहसीलदार प्रसाद कुलकर्णी व निवडणूक विभागाच्या नायब तहसीलदार बबीता आळंदे यांनी व निवडणूक विभागाचे नामदेव अर्जुने यांनी दिली आहे.

About The Author

error: Content is protected !!