शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायातुन धवल क्रांती करावी –
डॉ. अशोकराव दारनुळे

शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायातुन धवल क्रांती करावी -<br>डॉ. अशोकराव दारनुळे

उदगीर (एल.पी.उगीले) : अनेक नैसर्गीक आपत्तीमुळे शेत मालाचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेती व्यवसाय अवघड झाला आहे. त्यामुळे शेतकरी अर्थीक संकटात आहे. व शेतकरी आत्महत्या करत आहेत. ह्या दुष्ट चक्रावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी गाई व म्हशी पाळुन दुग्ध व्यवसाय केल्यास त्यांच्या जिवनात अर्थीक प्रगती होईल, व या व्यवसायातुन परिसरात धवल क्रांती होईल. असे सेवा निवृत पशुधन विकास अधिकारी व सध्या हेरिटेज डेअरीच्या माध्यमातुन पशुवैद्यकिय सेवेत कार्यरत असलेले डॉ.अशोकराव दारनुळे  यांनी सांगीतले.

जिव्हाळा ग्रुपचे  जेष्ट सदस्य सोपानराव माने यांच्या आध्यक्षते खाली आयोजित कार्यक्रमात जिव्हाळा ग्रुपचे संस्थापक व जेष्ठ विश्वनाथराव मुडपे गुरुजी, अध्यक्ष देविदासराव नादरगे ,विश्वनाथराव माळवाडीकर  ,लक्ष्मीकांत बिडवाई ,चंद्रकांत रोडगे  व अशोकराव बिरादार  व प्रमुख पाहुणे रामराव बिरादार  यांच्या उपस्थीतीत बोलताना डॉ.दारनुळे पुढे म्हणाले की, दुभत्या जनावरांचे लसीकरण करणे व त्यांना पौष्टीक खाद्य व हिरवा चारा देऊन दुग्ध उत्पादन वाढवावे.

तत्पुर्वी या कार्यक्रमात जिव्हाळा ग्रुपच्या अध्यक्षांनी डॉ.अशोकराव दारनुळे व रामराव जाधव यांचा स्मृती चिन्ह देऊन पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन रमाकांत बनशेळकीकरांनी केले तर आभार प्रदर्शन दशरथ शिंदेनी  व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.वैजनाथ पंचगल्ले,चंद्रकांत पांचाळ ,हावगीराव आचारे व सुभाष तगाळेनी  परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!