युवा नेतृत्व बालाजी परगे नावंदीचा विकास करेल – ज्ञानोबा केंद्रे
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील नावंदी ग्रामपंचायत येथे युवक क्रांती ग्राम विकास पॅनलच्या माध्यमातून युवा नेतृत्व बालाजी सोपानराव परगे हे निश्चितपणे गावचा सर्वांगीण विकास करतील, आणि तालुक्यामध्ये एक आदर्श गाव म्हणून नावंदी गावाची ओळख होईल. असा विश्वास युवा क्रांती ग्रामविकास पॅनलचे प्रमुख उदगीर पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानोबा पुंडलिकराव केंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
कोणताही व्यक्तिगत स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता केवळ आणि केवळ गावाच्या विकासाची संकल्पना मांडणारा तरुण म्हणून बालाजी परगे यांची ओळख आहे. त्यांनी विविध विकास सहकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या म्हणून योजना आणता येतील, ज्या ज्या सुविधा पुरवता येतील. त्या त्या पुरवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले.
सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करणारे तरुण नेतृत्व असलेल्या बालाजी परगे यांच्या पॅनलचे सर्वच उमेदवार कर्तबगार असून आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी ओळख निर्माण केलेली आहे. त्यामुळे सरपंच पदाचे उमेदवार बालाजी सोपानराव परगे तसेच वार्ड क्रमांक एक मधून उज्वला विद्यानंद माने, अनुसया शत्रुघ्न केंद्रे, केरबा माधवराव केंद्रे तर वार्ड क्रमांक दोन मधून शिवशंकर मदन परगे, उषा विकास वाघमारे, रसिका भीमदास मादळे आणि वार्ड क्रमांक तीन मधून राजपाल नामदेव नलावाड, कुसुम बालाजी मादळे आणि गावच्या विकासाची जाण आहे असे व्यक्तिमत्व भीमदास मादळे. असे कर्तबगार उमेदवार या पॅनल मध्ये आहेत.
गावच्या विकासासाठी व नागरी सुविधा प्रभावीपणे खेचून आणण्यासाठी तालुका आणि जिल्हास्तरावर ज्यांची पोहोच आहे, असे व्यक्तिमत्व असलेल्या परगे यांच्यासह त्यांच्या सर्व उमेदवारांना नावंदी चे ग्रामस्थ निश्चितपणे सहकार्य करतील. असा विश्वासही या प्रसंगी युवा क्रांती ग्रामविकास पॅनलचे पॅनल प्रमुख ज्ञानोबा केंद्रे यांनी व्यक्त केला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून तसेच नागरी सुविधांचा विचार करून कोणत्याही भूलथापांना बळी न पडता गावातील सर्व नागरिकांनी शिट्टी, नारळ ,अंगठी आणि गॅस सिलेंडर या चिन्हावर मतदान करावे. असेही आवाहन केंद्रे यांनी केले आहे.
