कोर्ट ऑफ द टेबल अवार्डने बालाजी आयनुले यांना सन्मानित!
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्याच्या शेजारी असलेल्या नागदरवाडी येथील रहिवासी बालाजी आयनुले यांना फायनान्शिअल प्लॅनिंग, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स, मध्ये दिला जाणार सर्वोत्कृष्ट कोर्ट ऑफ द टेबल इंटरनॅशनल अवार्ड पुणे येथील टॉप फायनान्शियल प्लॅनर बालाजी आयनुले यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
बालाजी आयनुले हे लातूर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यामध्ये नागदरवाडी या गावामधून एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामधून – पुणे येथे स्थायिक झाले. कष्ट, जिद्द प्रामाणिकपणा हे गुण मनी बागळून ते यशस्वी झाले आहेत. अवघ्या १३ वर्षात 4560 कुटुंबासोबत ते जोडले गेले.लोकांना सार्थिक, साक्षरता व फायनांसियल फ्रिडम मिळवुण देणे हेच त्यांचे धैर्य आहे. एकावेळी स्वता नोकरी करणारे आज ते स्वतःच्या Advicrest Financial या कंपनीच्या माध्यमातून अनेक लोकांना नोकरी देतात.आजपर्यंत त्यांना 15 वेळा MDRT (USA) कडून दिला जाणारा अवॉर्ड मिळाला आहे. त्याचबरोबर 35 राष्ट्रिय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या इंटरनॅशनल कॉन्फेरंस ला भारतातफ्रें सामील होऊन प्रतिनिधित्व करणार आहेत . त्याचबरोबर, राज्यशासनाच्या प्रशिक्षण धोरणाआंतर्गत गट ‘अ’ क्लासवन ऑफिसर साठी Porsonal Fianancial Management या सब्जेक्ट वर ट्रेनिंग देतात.तसेच तंत्रज्ञान निर्मिती कंपनी मध्ये ते ट्रेनिंग देतात . यामुळे मराठी पाऊल पडते पुढे, मानतात तसे होत असल्याचे दिसून येते आहे.
या यशात त्यांना विकास आधिकारी पितांबर देविकर ,वरिष्ठ शाखा प्रबंधक व्ही आर राव , संतोष बांगर, , देवेंद्र सोरटे, अशोक देटे यांच्या सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले . यामध्ये त्यांची पत्नी रोहिणी आयनुले यांचा देखील मोलाचा वाटा आहे.
