रामभाऊ देवसरकर मित्र मंडळ चातारी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
यवतमाळ (राम जाधव) : गरजू रुग्णांना रक्ताची टंचाई भासू नये म्हणून रक्तदान शिबीर घेणे ही तशी नित्याची बाब झाली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळे व राजकीय पक्ष अशी शिबिरे आयोजित करत असतात. मात्र आ. रामभाऊ देवसरकर अर्थ व बांधकाम सभापती जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त चातारी गावामध्ये आयोजित केलेलं रक्तदान शिबीर सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. त्याला कारणही तसंच आहे.
कोविड महामारीच्या काळातील वैद्यकीय आणीबाणीमुळे राज्यात अनेक ठिकाणी रक्ताची टंचाई भासू लागली आहे. हे लक्षात घेऊन रामभाऊ देवसरकर मित्र मंडळ चातारी यांनी या रक्तदान शिबिराचं आयोजन 13 मार्च शनिवारी केलं होत त्यात 70 पेक्षा जास्त लोकांनी रक्तदान केलं. कार्यक्रमाला रामभाऊ देवसरकर तसेच शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल माने, भगवान माने, माधव शामराव माने,जांबुवंतराव माने सदस्य आपला जिन प्रेस उमरखेड, राहुल माने, डॉ संतोष माने, विनायक माने, विठ्ठल शामराव माने, शाम धात्रक, अफसर भाई, डी.जी.माने, बालाजी दादाराव माने विजय कदम, संतोष दत्तराव माने, गणेश धोंडबाराव माने,संतोष केशव माने, शरद अशोकराव माने, अरविंद माने, निरंजन माने, संदीप माने, सौरभ माने, सुशील शेषेराव माने उपस्थिती होते.