निसर्गाचा खरा चेहरा – भोगवे बीच

निसर्गाचा खरा चेहरा - भोगवे बीच

अमित तिकटे

मित्रांनो आपण नक्कीच वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देत असतो , कुठंतरी काहीतरी वेगळं पण आपणास निसर्गातून पहावयास मिळत असतं. निसर्गाची किमया प्रत्येक ठिकाणी पहावयास मिळते.
परदेश वारी विसरा हो ! जीवनातून एकदा तरी आपण आपला महाराष्ट्र पूर्ण फिरून तरी पहा स्वर्गाचे दर्शन झाल्या शिवाय राहणार नाही.

निसर्गाचा खरा चेहरा - भोगवे बीच

आपण विचारात पडला असणार कारण भरपूर मंडळी ही महाराष्ट्र भ्रमण केलेली आहे. तेही त्यातल्या त्यात महाराष्ट्रात स्वर्गाचे दर्शन ? कसं शक्य आहे !

होय शक्य आहे आम्ही त्याच स्वर्गा बद्दल बोलतोय म्हणजे सिंधदुर्गं जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव म्हणजे भोगवे. खरं सांगायचं म्हणलं ना मित्रांनो भोगवे मध्ये निसर्गाने त्याची स्वतः वेळ काढून स्वतः ची कला सादर केली आहे असं म्हणायला हरकत नाही.

निसर्गाचा खरा चेहरा - भोगवे बीच

डोंगर भाग – आहे , नारळी पोकळीच्या बागा – आहेत , घनदाट जंगल – आहे , वन्यजीव प्राणी – आहेत , नीळक्षार पाणी – आहे , अथांग समुद्र – आहे , सूंदर व स्वच्छ बीच – आहे . या पलीकडे भरपूर काही आहे शब्दांत मांडता येणार नाही. मित्रांनो आम्ही बोलतोय पर्यटकांची सुरक्षितता आणि स्वछता या साठी दिला जाणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार म्हणजेच ब्लु-फ्लॅग पुरस्काराने सन्मानित असलेल्या भोगवे बीच बद्दल..

निसर्गाचा खरा चेहरा - भोगवे बीच

नागमोडी वळणाच्या वाटेने आपण तळकोकणातील या स्वर्गातून जातो ज्या ठिकाणी निसर्गाने त्याच्या डोगराळ भागात हिरवी चादर ओढून घेतली आहे.. अथांग समुद्रातून येणार लाटे आवाज आपणास मंत्रमुग्ध करत असतो. एखादा गायक जर गायला लागला तर त्याला साथ समुद्राच्या लाटेची आणि विविध पक्षांच्या किलबिलाटाची साथ असते. असा निसर्ग आपल्याला पहावयास आणि अनुभवास मिळाल्यावर खरचं आपण स्वर्गात आलोय असं सांगायला नक्की आवडेल.

निसर्गाचा खरा चेहरा - भोगवे बीच

विशेष बाब मानवी रहदारी कमी आणि इंटरनेट च्या युगात मोबाईलला सुट्टी, नो नेटवर्क एरिया. मोबाईल फक्त हा फोटो काढायच्या कामाचा राहतो. एवढंच नाही निवती बीच , देवबाग बीच , तारकर्ली बीच , मालवण बीच या सुद्धा बीचेस वर निसर्गाचा करिष्मा अनुभवायला मिळत असतो. सिंधुदुर्ग किल्ला , निवती किल्ला , साहसी वॉटर स्पोर्ट्स , बर्ड वॉचिंग , डॉल्फिन पॉईंट , सुनामी आयलंड , डीप वॉटर स्कुबा डायव्हिंग , फिशिंग , लाईट हाऊस , कोरजाई बॅक वॉटर , कर्ली नदी आणि अरबी समुद्र संगम पॉईंट , ज्या नदीला फक्त वर्षातून तीन महिने गोड महिने बाकी महिने खारं पाणी हे फक्त आपल्याला तिथचं पहायला मिळणार.

निसर्गाचा खरा चेहरा - भोगवे बीच

आपल्याला कमीत कमी अंतरावर जास्तीत जास्त गोष्टी पहायला मिळतात आपले 4 दिवस कसे गेले कळणार सुद्धा नाही.

मित्रांनो,
” येवा कोकण आपलाच असा “

नक्की भेट द्या आणि पहा , अनुभवा निसर्गाचा खरा चेहरा.

About The Author