प्रसाद कुमठेकर यांचे साहित्यातील बोलीभाषा यावर व्याख्यान संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्याने साहित्यातील बोलीभाषा या विषयावरचे प्रसाद कुमठेकर यांचे व्याख्यान संपन्न झाले. सदरील व्याख्यान दूरदृश्य प्रणाली द्वारे घेण्यात आले. कुमठेकर म्हणाले, गेल्या वीस वर्षापासून बोलीभाषेकडे लक्ष दिले जात आहे. जी वापरली जाते तीच बोली टिकते, बोलीतून बोला, वाचा, व्यक्त व्हा. ऐकाल, बोलाल तरच बोली टिकते. विद्यार्थ्यांनी भाषा समृद्ध होण्यासाठी मराठी शब्दकोशाचा वापर करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा.डॉ.दीपक चिद्दरवार यांनी केले, अध्यक्षीय समारोप उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के यांनी केला, सूत्रसंचालन प्रा.डॉ.बी. आर.दहिफळे यांनी केले, तर आभार प्रा.डॉ.ए.पी.मोरे यांनी मानले.