शिवाजी महाविद्यालय उदगीर यांचा महाऊर्जा एम्पानेल एनर्जी प्लॅनर व ऑडिटर केदार खमीतकर यांच्यासोबत सामंजस्य करार

उदगीर (एल.पी.उगीले) : नैसर्गिक साधन संपत्तीचे योग्य पद्धतीने वर्गीकरण व्यवस्थापन व संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. व त्यासाठी त्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थेसोबत सामंजस्य करार करून सोबत कार्य करणे हा एक उत्तम पर्याय असल्याचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. जाधव यांनी सांगितले.

शिवाजी महाविद्यालय उदगीर यांचा महाऊर्जा एम्पानेल एनर्जी प्लॅनर व ऑडिटर केदार खमीतकर यांच्यासोबत सामंजस्य करार

सामंजस्य करार परस्परहित संबंध लक्षात घेत विद्युत, जल, ऊर्जा यांचे लेखापरीक्षण, इंधन संवर्धन व संरक्षण यांच्या जनजागृतीसाठी संयुक्त प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट असून हा सामंजस्य करार ऊर्जा संवर्धन कायदा 2001 अंतर्गत पूर्ततेसाठी एकत्र काम करेल, असे ग्रीन अँड एनर्जी ऑडिटर केदार खमितकर म्हणाले.

यावेळी शिवाजी महाविद्यालय उदगीर चे प्राचार्य डॉ. व्ही. ए. जाधव, बीईई केंद्रीय विद्युत मंत्रालय प्रमाणित ऊर्जा ऑडिटर केदार खमितकर, अभियंते किरण खमितकर , IQAC समन्वयक डॉ. विष्णू पवार उपस्थित होते.

About The Author