लाल बहादुर शास्त्री विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

लाल बहादुर शास्त्री विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 126 वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बाबुराव आडे, तसेच उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड,पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले, माधव मठवाले अभ्यासपूरक मंडळ प्रमुख विनायक इंगळे हे मान्यवर उपस्थित होते.

प्रतिमा पूजनानंतर मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. श्रावणी सन्मुखे,संध्या बोडके,सर्वजीत अनवले,मयुरी वट्टमवार यांनी आपल्या मनोगतात नेताजींच्या जीवन चरित्रावर व कार्यावर प्रकाश टाकला.

अध्यक्षीय मनोगतात बाबुराव आडे म्हणाले की, ” आज संपूर्ण देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 126 वी जयंती साजरी करत आहे. या दिवसाला पराक्रम दिवस म्हणूनही साजरा करतात. त्यांचे जीवनकार्य, त्यांचे विचार, देशासाठी केलेला कठोर त्याग, युवकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी.प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करावे. “असे सांगितले.

एम.टी. एस ऑलंपियाड या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत राज्यात 29 वा क्रमांक व स्पेशल गोल्ड मेडल प्राप्त केल्याबद्दल सेजल गजानन राजुरवार हिचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. तिला शोभा नेत्रगावकर व नीता मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अक्षरा दूरगकर तर आभार नीता मोरे यांनी मानले.

About The Author