हळदी कुंक कार्यक्रमातून महिलाना आर्थिक सक्षम बनविण्याचा नेहा क्रियेशनचा उपक्रम

उदगीर (एल.पी.उगीले) : आपल्या सारखेच इतर महिलांनाही घरातच व्यवसाय उभा करून स्वयंपूर्ण बनावे, यासाठी येथील नेहा जोशी यांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून चिठ्या द्वारे निवड झालेल्या अकरा महिलांना व्यवसाय प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

हळदी कुंक कार्यक्रमातून महिलाना आर्थिक सक्षम बनविण्याचा नेहा क्रियेशनचा उपक्रम

उदगीर येथील केक आणि पिझ्झा व्यवसायात आपला स्वतः चा ब्रँड निर्माण केलेल्या नेहा क्रियेशन्स श्री केक पॅलेसच्या संचालिका नेहा जोशी यांनी मकर संक्रांती निमित्य हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केले होते . यावेळी आलेल्या प्रत्येक महिलांना एक चिठ्ठी निवड करण्यास सांगितले . यात एका भाग्यवान विजेत्याला संपूर्ण मोफत व्यवसायाचे प्रशिक्षण तर दहा महिलांना व्यवसाय प्रशिक्षण शुल्कात पन्नास टक्के सवलत देण्यात आली . यात सुरेखा बेंडे यांना मोफत प्रशिक्षणाची संधी प्राप्त झाली, तर सुनीता मोरतळे , रंजना गुडसरकर , अनुजा घोडके , सारिका कुलकर्णी , प्रभा देशमुख , भाग्यश्री जाधव , रेश्मा कांबळे , स्वाती कुलकर्णी , संगीता जिंकलवार , शुभांगी जगताप या महिला पन्नास टक्के सवलत भाग्यवान विजेत्या ठरल्या आहेत . या महिलांना नेहा जोशी या घरच्या घरी आकर्षक डिझाईन प्रमाणे शाकाहारी केक कसा बनवायचा याचे प्रशिक्षण देणार आहेत.

चौकट
वाढत्या महागाईच्या काळात मुळातच चविष्ट पदार्थ बनविणाऱ्या गृहिणींना आपल्या सर्व जबदाऱ्या सांभाळून या व्यवसायाची सुरुवात करता येवू शकते.उदगीरच्या माहेरवाशीनिनी नाशिक , हैद्राबाद , कमलनगर , येरोल , लातूर , येथे व्यवसाय सुरू करून आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनल्या . यामुळे मला ही कल्पना सुचली . महिलांना माझ्या प्रमाणेच व्यवसाय करून कुटुंबाचा आर्थिक भार उचलता यावा आणि त्याना स्वयंपूर्ण बनता यावे यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न .
—- नेहा जोशी
— संचालिका–
नेहा क्रियेशन्स श्री केक पॅलेस उदगीर

About The Author