रि. पा. इं (आ ) युवक आघाडी लातूरच्या जिल्हाध्यक्षपदी सुशीलकुमार शिंदे यांची निवड
उदगीर (एल.पी.उगीले): रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) युवक आघाडी लातूरच्या अध्यक्षपदी युवानेते सुशीलकुमार शिंदे यांची निवड केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार रि. पा. इं. (आ ) चे लातूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे व मराठवाडा सरचिटणीस देविदास कांबळे यांनी केली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ ) युवक आघाडीचे जिल्हासरचिटनीस असणारे सुशीलकुमार शिंदे यांनी गेल्या 17 वर्षापासून केलेल्या सामाजिक, संस्कृतीक, शैक्षणिक, व राजकीय कार्याची दखल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेऊन सुशीलकुमार शिंदे यांची युवक जिल्हाध्यक्ष म्हणून निवड लेली आहे.
ही निवड झाल्याबद्दल चंद्रकांत चिकटे, देविदास कांबळे, बाबासाहेब कांबळे अंकुश ढेरे, ऍड. प्रफुल्लकुमार उदगीरकर जितेंद्र बनसोडे, पप्पू सरवदे,विनोद कांबळे, गणेश कांबळे, अरुण वाघम्बर, पपण कांबळे, राहूल कांबळे, नितीन गायकवाड, अतुल घोडके, अमोल शृंगारे, कपिल शिंदे, अतुल कांबळे, कपिल सोनकांबळे, नरेश चांदे, मिलिंद बनसोडे, प्रफुल्ल कांबळे, राजकुमार माणसे, पुरंदर बोडके , सागर सोनकांबळेआदींनी या निवडीचे स्वागत केले आहे.